डोक्याला भगवी ओढणी, 'जय श्रीराम'चा नारा; नवनीत राणांची 'बुलेट राईड' चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:45 AM2023-03-30T10:45:11+5:302023-03-30T10:54:42+5:30

Navneet Rana : नवनीत राणा यांनी रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

navneet rana bullet ride occasion of ram navami 2023, amravati | डोक्याला भगवी ओढणी, 'जय श्रीराम'चा नारा; नवनीत राणांची 'बुलेट राईड' चर्चेत!

डोक्याला भगवी ओढणी, 'जय श्रीराम'चा नारा; नवनीत राणांची 'बुलेट राईड' चर्चेत!

googlenewsNext

मुंबई : राज्यासह देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यात शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीसह ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. त्यात मुंबईतल्या वडाळा राम मंदिरात देखील भाविकांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळते. यानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनीही रामनवमी निमित्त हटके शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांनी रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. नवनीत राणा यांनी काळा पोशाख परिधान करून भगवी ओढणी बांधून बुलेट राईड केली आहे. तसेच, बुलेट चालवत 'जय श्री राम'चा नारा दिला आहे. सध्या हा सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

याचबरोबर, मुंबई, दिल्ली, अयोध्या आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे 'हिंदू शेरणी' नावाचे बॅनर लागले आहेत. याशिवाय, 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त अमरावती येथे हजारो लोकांच्या उपस्थितत भव्य हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. यानिमित्ताने नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. 

उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार आहे. हनुमान चालीसा वाचली नाही म्हणून त्यांची सत्ता गेली, पक्ष गेला. आता तरी उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसाच पठण करावे असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. तसेच, ६ एप्रिलला होणाऱ्या सामूहिक हनुमान चालीसाचा आवाज मातोश्रीपर्यंत व उद्धव ठाकरे यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आमचा सामूहिक हनुमान चालीसा पठण आहे, असा दावा नवनीत राणा यांनी केला. 

Web Title: navneet rana bullet ride occasion of ram navami 2023, amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.