Navneet Rana: नवनीत राणांचे 'डी गँग'च्या लकडावालाशी आर्थिक संबंध, लाखोंचे कर्ज; संजय राऊतांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 20:50 IST2022-04-26T20:47:46+5:302022-04-26T20:50:21+5:30
Navneet Rana Money Laundering, Sanjay Raut? मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि फायनान्सर युसूफ लकडावालाचा (७६) ऑर्थर रोड कारागृहात याचा सप्टेंबर २०२१ मध्ये ऑर्थर रोड तुरुंगात मृत्यू झाला होता. तो दाऊद गँगचा फायनान्सर होता असे आरोप होत आले आहेत.

Navneet Rana: नवनीत राणांचे 'डी गँग'च्या लकडावालाशी आर्थिक संबंध, लाखोंचे कर्ज; संजय राऊतांचा गंभीर आरोप
खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. राणा यांनी दाऊद गँगशी संबंधीत आणि ईडीने ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून लाखो रुपये घेतले होते, असा आरोप केला आहे. याचे फोटोसह ट्विट राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे त्यांनी दिलेल्या अॅफिडेविटवर नमूद आहे. युसुफ लकडावाला याचा काही दिवसांपूर्वीच तुरुंगात मृत्यू झाला. याच लकडावालाला ईडीने पैशांची अफरातफर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती, असे ट्विट राऊतांनी केले.
याचबरोबर ईडीला प्रश्न विचारताना ईडी यामध्ये तपास करणार आहे का? हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे, असे म्हणत पंतप्रधान कार्यालय, ईडी आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे. यामुळे आता ईडी यावर कारवाई करणार का, नाही केल्यास शिवसेना कोणचे पाऊल उचलणार हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.
Navneet Rana recvd a LOAN of ₹80 lacs frm Yusuf Lakdawala who died in Jail rcntly.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022
The same Lakdawala ws arrestd by @dir_ed in a money laundrng case & hs links wth D gang.
My questn is- Has ED investigatd ths mattr? Ths is a questn of nationl security!@PMOIndia@Dev_Fadnavispic.twitter.com/1QBKadT6y6
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि फायनान्सर युसूफ लकडावालाचा (७६) ऑर्थर रोड कारागृहात याचा सप्टेंबर २०२१ मध्ये ऑर्थर रोड तुरुंगात मृत्यू झाला होता. मनी लाँड्रिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. २०१९ मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली लकडावालाला (७६) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर हैदराबादचे नबाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथील जमिनीशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्याला अटक केली. वारंवार समन्स बजावूनदेखील हजर न झाल्यामुळे ईडीने अटकेची कारवाई केली.