घरातीलच महिलेला मुख्यमंत्री बनवण्याचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न; नवनीत राणांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 03:35 PM2022-12-01T15:35:42+5:302022-12-01T15:36:03+5:30

आता ही महिला कोण ती घरातीलच आहे की घरच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का? असा टोला नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Navneet Rana's target Uddhav Thackeray over Women CM Statement | घरातीलच महिलेला मुख्यमंत्री बनवण्याचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न; नवनीत राणांचा टोला

घरातीलच महिलेला मुख्यमंत्री बनवण्याचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न; नवनीत राणांचा टोला

Next

अमरावती - महिला मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्रात झाले नाही. जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर अभिमानास्पद आहे. पण उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंकडील विरोधी पक्षनेतेपद एका महिलेलं द्यावं. जर त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरच भरवसा नसेल तर ते खोटी स्वप्न दाखवतायेत. महिलांची शक्ती आता उद्धव ठाकरेंना दिसतेय. पहिले विरोधी पक्षनेतेपद महिलेला द्या अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. 

नवनीत राणा म्हणाल्या की, जंगल पूर्ण खाली झाल्यानंतर एकटे डरकाळी फोडतायेत. पहिले विरोधी पक्षनेतेपद द्यावे मग मुख्यमंत्रिपद द्यावं. आता ही महिला कोण ती घरातीलच आहे की घरच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं स्वप्न पाहत आहात का? कोणतीही महिला मुख्यमंत्री झाली तरी अभिमान वाटेल. ५० पैकी ४० गेले आणि उद्धव ठाकरे खोटी आश्वासने द्यायला लागलीत असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत राजकीय क्षेत्रात ज्या महिला वर येतात. आमदार, खासदार म्हणून काम करतात ते खूप संघर्षातून पुढे येतात. आमदार,खासदार राहिलेली महिला राज्याचा कारभार हाताळणार असेल तर चांगलीच बाब आहे. परंतु ही सर्व खोटी आश्वासने उद्धव ठाकरे देतायेत. जर महिला मुख्यमंत्री करायचा विचार असता तर स्वत: मुख्यमंत्रिपद घेतले नसते. मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी त्यांनी पक्ष उद्ध्वस्त केला असा आरोपही नवनीत राणा यांनी लावला आहे. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावरही जोरदार तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही सांगितलं की मला पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे. पण मला मुख्यमंत्री करण्याची गरज नाही. पण माझ्या हक्काचा शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा आहे. हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता सत्यात उरवायचं असेल तर तुम्हाला सोबत येऊन वाड्या वस्त्यांमध्ये ही विचारांची मशाल घेऊन जावी लागेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


 
 

Web Title: Navneet Rana's target Uddhav Thackeray over Women CM Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.