नवोदयचे ऑपरेशन ‘मिशन क्लिन’

By Admin | Published: April 16, 2015 12:37 AM2015-04-16T00:37:06+5:302015-04-16T00:37:06+5:30

विद्यार्थिंनींच्या लैंगिक छळ प्रकरण; नवोदयमधील बहुतांश कर्मचा-यांच्या होणार बदल्या.

Navoday Operation 'Mission Clean' | नवोदयचे ऑपरेशन ‘मिशन क्लिन’

नवोदयचे ऑपरेशन ‘मिशन क्लिन’

googlenewsNext

सचिन राऊत / अकोला : विद्यार्थीनींच्या लैगिंक छळप्रकरणी जवाहर नवोदय विद्यालयाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता ह्यमिशन क्लिनह्ण राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून बहुतांश शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची माहीती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली. येथील नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे खळबळजनक प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. शैलेश रामटेके, राजन गजभिये आणि संदीप लाडखेडकर या शिक्षकांनी लैगिंक छळ केल्याच्या तक्रारी ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी केल्या होत्या. या प्रकरणी तीनही शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे शिक्षक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या शिक्षक ांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्ररणी प्राचार्य आर. सिंह यांची तडकाफडकी दमन येथे बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उपप्राचार्या साधना गलाला आणि वसतीगृह अधिक्षिका वंदना कांबळे यांची बदली करण्यात आली आहे. विद्यालयात एकूण ३२ शिक्षक व १0 शिक्षकेतर कर्मचारी आहे. प्राचार्य, उपप्राचार्यासह ६ शिक्षकांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे विद्यालयाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थी-पालकांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी बहुतांश कर्मचार्‍यांच्या इतरत्र बदल्या केल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

*३00 विद्यार्थी ४२ कर्मचारी वृंद नवोदय विद्यालयात सुमारे ३00 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना शिक्षण देण्यासाठी ३२ शिक्षकांसह १0 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यामधील सात ते आठ जणांवर कारवाई करण्यात आली असून, इतर बहुतांश शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आता बदल्या करण्यात येणार आहेत. 

Web Title: Navoday Operation 'Mission Clean'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.