विविध स्पर्धांमुळे रंजक ठरला नवरात्रौत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:22 PM2020-10-30T18:22:15+5:302020-10-30T18:22:15+5:30
Navratri Festival: उत्सव नवरात्रीचा : लोकमत प्रस्तुत स्टार प्रवाह आणि सपट परिवार चहा यांच्या सहकार्याने आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यावर्षीचा नवरात्र उत्सव दरवर्षीपेक्षा निश्चितच वेगळा होता. रस्त्यावर गर्दी नसली, गरबा-दांडियाची लगबग नसली तरी उत्साह मात्र तोच होता. अशाच चैतन्यमय वातावरणात पार पडलेल्या लोकमत आयोजित, स्टार प्रवाह आणि सपट परिवार चहा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ‘उत्सव नवरात्रीचा’ या कार्यक्रमालाही सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत फेसबुक लाईव्हला सखींची मोठ्या प्रमाणावर असलेली उपस्थिती आणि सखींनी कमेंट्सच्या माध्यमातून दिलेला प्रतिसाद लक्षणीय ठरला. या उत्सवांतर्गत ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेचे निर्माते महेश कोठारे, क्रिएटिव्ह हेड सतीश राजवाडे, उर्मिला कोठारे यांनी सखींशी संवाद साधला.
दरम्यान, नाशिक येथील राजश्री धुमाळ आणि प्रांजली बिरारी यांनी गायलेल्या नवदुर्गा स्तोत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागपूर येथील सुप्रसिद्ध गायिका आकांक्षा नगरकर यांच्या ‘माय भवानी, तू दुर्गा तू भवानी’ या गाण्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुप्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातार हिची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.
सखीमंच माध्यमातून मालिकेचा शुभारंभ
लोकमत आयोजित ‘उत्सव नवरात्री’चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेसाठी सर्व सखींचा पाठिंबा मिळतो आहे. आम्ही मालिकेचा शुभारंभ सखी मंचच्या माध्यमातून करत आहोत, याचा आनंद आहे.
- सतीश राजवाडे
स्त्रीची इच्छाशक्ती महत्त्वाची
स्त्रीने ठरविले तर ती तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करू शकते. तसेच कुठल्याही अडचणींवर मात करू शकते. स्त्रीची विविध रूपे स्टार प्रवाहच्या विविध मालिकांमधून आपल्याला नेहमीच दिसतात.
- उर्मिला कोठारे
सखी मंच मोठे व्यासपीठ
लोकमत सखी मंच हे खूप मोठे व्यासपीठ आहे. नेहमी आम्हाला सखींचा जसा पाठिंबा मिळतो, तसाच तो या मालिकेलाही मिळेल, अशी आशा आहे.
- महेश कोठारे
स्त्री ही विश्वाची निर्माती आहे, याच विचारातून जागर तुमच्या परिवारातील स्त्रीशक्तीचा ही संकल्पना सुचली, असे ‘उत्सव नवरात्रीचा’ या कार्यक्रमाचे पार्टनर असणाऱ्या सपट परिवार चहाचे ब्रँड मॅनेजर तसेच या संकल्पनेचे कन्टेन्ट हेड शरद काळे यांनी सखींशी संवाद साधताना सांगितले.
सर्व विजेत्यांनी 81084 69407 या क्रमांकावर संपर्क साधावा.
काही कारणास्तव ज्यांना कार्यक्रम बघता आला नाही ते या लिंकवर क्लिक करून http://bit.ly/Navratrievent कार्यक्रम बघू शकता.