नौदल, तटरक्षक दल सज्ज

By Admin | Published: June 11, 2016 02:11 AM2016-06-11T02:11:50+5:302016-06-11T02:11:50+5:30

नालेसफाईच्या कामाबाबत साशंकताच व्यक्त होत असल्याने यंदा मुंबईत पाणी भरणार नाही

Navy, Coast Guard Ready | नौदल, तटरक्षक दल सज्ज

नौदल, तटरक्षक दल सज्ज

googlenewsNext


मुंबई : नालेसफाईच्या कामाबाबत साशंकताच व्यक्त होत असल्याने यंदा मुंबईत पाणी भरणार नाही, याची शाश्वती महापालिकेलाही देता आलेली नाही़ त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवल्यास मुंबईकरांच्या मदतीसाठी नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाबरोबरच पहिल्यांदाच आर्मीच्या सहा तुकड्याही तैनात ठेवण्यात येणार आहेत़
मान्सून लवकरच मुंबईत दाखल होण्याचे संकेत आहेत़ त्यामुळे मान्सूनपूर्व कामांची रंगीत तालीम घेण्यात येत आहे़ पावसाळ्यात आपत्ती ओढावल्यास मदतकार्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय़ ए़ कुंदन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पाण्याचा निचरा त्वरित होण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत आठ ठिकाणी पम्पिंग स्टेशन, नाल्यांचे रुंदीकरण, पर्जन्य वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली़ तरीही ताशी केवळ ५० मि़मी़ पावसाच्या पाण्याचा निचरा होत आहे़ मात्र मुसळधार पाऊस आणि समुद्रात ४़३ मीटरहून उंच लाटा उसळल्यास मुंबई जलमय होत असल्याचे चित्र कायम आहे़ (प्रतिनिधी)
>पाणी तुंबण्याच्या ठिकाणांवर वॉच
२३८ सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाणी भरणाऱ्या ठिकाणांवर नजर ठेवून आवश्यकतेनुसार मदत पुरविणे व पाण्याचा निचरा केला जाणार आहे़ तसेच २४ विभागीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत़ या कक्षाला प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळ देण्यात आले आहे़
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक बोलाविण्यात येत होते़ या वर्षीपासून हे पथक मुंबईतच तैनात करण्यात आले आहे़ त्याचबरोबर पायदळ, नौदल, भारतीय तटरक्षक दल यांच्याही तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत़
धोकादायक वृक्षांवर नजर
मुंबईत ५४ हजार ९४२ वृक्ष धोकादायक आहेत़ यापैकी ३३ हजार वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात आल्या आहेत़ मात्र पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याचा धोका असल्याने वृक्ष अवेक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असणार आहे़
तटरक्षक दल़... चार पथके तैनात, प्रत्येक पथकात चार सदस्य, कुलाबा, वरळी व मानखुर्द येथे ही पथके तैनात, या पथकांकडे तरंगते तराफे, लाइफ जॅकेट्स, प्रथमोपचार संच आहेत़ नि:शुल्क हेल्पलाइन क्ऱ १९५४ तसेच पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडली आहेत.
>पालिकेच्या पाच शाळांमध्ये तात्पुरते निवारे
पर्जन्य जलवाहिन्यांच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी २९३ ठिकाणी पंप
आकस्मिक खर्चाकरिता एक लाख रुपये प्रत्येक विभागासाठी उपलब्ध
पुरातून नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी २० जीवरक्षक तराफे

Web Title: Navy, Coast Guard Ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.