तिवरे धरण दुर्घटना : 'भ्रष्ट मोठे मासे वाचविण्यासाठी खेकड्यांचा बळी'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 02:19 PM2019-07-05T14:19:03+5:302019-07-05T14:20:30+5:30
मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडी गावावर मोठे संकट आले. काहीजण जेवायला बसले होते, काहीजण झोपले होते. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि काही तासातच अख्खी भेंदवाडी धरणाच्या पाण्याने गिळली.
मुंबई - तिवरे धरण फुटीनंतर जलंसधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या अजब दाव्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. भ्रष्ट माठे मासे वाचविण्यासाठी खेकड्यांचा बळी देण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. या संदर्भात मलिक यांनी ट्विट केले आहे.
मलिक म्हणाले, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत तिवरे धरण फुटल्याबद्दल खेकड्यांना जबाबदार धरतायत. पक्षातील त्यांच्या कंत्राटदार आमदाराला पाठिशी घालण्यासाठी हे निर्लज्ज समर्थन आहे. भ्रष्ट मोठे मासे वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी दिला जातोय. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी केली.
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत तिवरे धरण फुटल्याबद्दल खेकड्यांना जबाबदार धरतायत. त्यांच्या कंत्राटदार आमदाराला पाठीशी घालण्यासाठी हे निर्लज्ज समर्थन आहे. भ्रष्ट मोठे मासे वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी दिला जातोय. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
— NCP (@NCPspeaks) July 5, 2019
- @nawabmalikncppic.twitter.com/Bru7VSl4TJ
मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडी गावावर मोठे संकट आले. काहीजण जेवायला बसले होते, काहीजण झोपले होते. अचानक पाण्याचा लोंढा आला आणि काही तासातच अख्खी भेंदवाडी धरणाच्या पाण्याने गिळली. या दुर्घटनेत आतापर्यंत एकुण १८ मृतदेह हाती लागले असून अजून पाचजण बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.