Chandrakant Patil on Nawab Malik: 'तुमचा एक मंत्री जेलमध्ये तर दुसरा...', चंद्रकांत पाटलांनी वाचला पाढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:07 IST2022-02-23T16:07:28+5:302022-02-23T16:07:43+5:30
Chandrakant Patil on Nawab Malik: 'नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही.

Chandrakant Patil on Nawab Malik: 'तुमचा एक मंत्री जेलमध्ये तर दुसरा...', चंद्रकांत पाटलांनी वाचला पाढा
मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना चौकशीनंतर ईडी(ED)ने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनीही मलिकांच्या अटकेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका केली, तसेच मंत्र्यांच्या प्रकरणांचा पाढाच वाचला.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'अशाप्रकारचे आरोप झाल्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणी करतो की, त्यांनी मलिक यांची तात्काळ हकालपट्टी करावी. मलिकांची हकालपट्टी केली नाही', तर भाजप आंदोलन करेल.
ते पुढे म्हणाले की, 'मुख्यमंत्री आता कशाची वाट पाहताहेत? तुमच्या एक मंत्री मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गेला, तुमचा गृहमंत्री जेलमध्ये आहे, मुंबईचे पोलिस कमिश्नर अचानक गायब होता, त्यांच्यावरही केसेस आहेत. तुमचा एक पोलिस अधिकारी सचिन वाझे जेलमध्ये आहेत, तुमचे एक मंत्री ईडीसमोर हजर राहत नाहीत, म्हणून त्यांनासक्तीन हजर करावं लागतं.'
'माझ्याकडे 22 पानी नोट'
'तुमच्या एका मंत्र्यांचे रिसॉर्ट तोडण्याची केंद्रातून ऑर्डर निघाली तर दुसऱ्या एकाने भीतीपोटी स्वतः बंगला तोडला, तुमच्या एका मंत्र्यांच्या दोन बायका आहेत, जे कायद्यात बसत नाही, ही यादी वाचताना मला दम लागला. मी एक नोट तयार केली आहे, ज्यामध्ये या सरकारमधील मंत्र्यांनी काय-काय केले त्याची यादी आहे. ही यादी तयार करताना 22 पाने भरली. ही अशी सगळी प्रकरणे असूनही सरकार काहीच करत नाहीत', अशी टीका पाटील यांनी केली.