नवाब मलिकांना डच्चू, जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 05:33 PM2022-09-16T17:33:20+5:302022-09-16T17:35:08+5:30

राष्ट्रवादीने आज आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10-11 सप्टेंबरला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती.

Nawab Malik omitted, Jitendra Awhad get big responsibility in NCP's National office Bearers, secretary, spokesperson; Sharad pawar Finalize list | नवाब मलिकांना डच्चू, जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

नवाब मलिकांना डच्चू, जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी; राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

Next

जमिन घोटाळ्यात सापडलेल्या माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाला राष्ट्रवादीने हात लावला नव्हता. परंतू, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून त्यांना डच्चू दिला आहे. तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी दिली आहे. 

राष्ट्रवादीने आज आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10-11 सप्टेंबरला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कार्यसमिती सदस्य, स्थायी निमंत्रित, प्रदेशाध्यक्ष, आघाडीच्या संघटना, विभाग इत्यादींसह पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले. यानुसार पवार यांनी कार्यकारिणीची यादी जारी केली आहे. 

मलिक आणि आव्हाड हे राष्ट्रवादीचे आघाडीचे प्रवक्ते होते. परंतू मलिक यांना काढून टाकण्यात आले आहे. तर आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

यानुसार राष्ट्रीय पदाधिकारी:
1.  शरद पवार - राष्ट्रीय अध्यक्ष
2.  प्रफुल्ल पटेल - राष्ट्रीय उपाध्यक्ष
3.  सुनील तटकरे - राष्ट्रीय सरचिटणीस
4. योगानंद शास्त्री - राष्ट्रीय सरचिटणीस
5. के के शर्मा - राष्ट्रीय सरचिटणीस
6. पीपी मोहम्मद फैजल - राष्ट्रीय सरचिटणीस
7.  नरेंद्र वर्मा - राष्ट्रीय सरचिटणीस
8. जितेंद्र आव्हाड - राष्ट्रीय सरचिटणीस
९. वाय पी त्रिवेदी - राष्ट्रीय कोषाध्यक्ष
10. एस आर कोहली - स्थायी सचिव

राजीव झा, हेमंत टकले, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, राजेंद्र जैन यांची नियुक्ती राष्ट्रीय सचिव पदावर करण्यात आली आहे. 

प्रवक्ते कोण कोण....
तर प्रवक्ते म्हणून नरेंद्र वर्मा यांची सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते, धीरज शर्मा यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस व प्रवक्ते, सुश्री सोनिया दोहान यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि प्रवक्त्या, सीमा मलिक यांची राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 
 

Web Title: Nawab Malik omitted, Jitendra Awhad get big responsibility in NCP's National office Bearers, secretary, spokesperson; Sharad pawar Finalize list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.