नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, चंद्रकांत पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:35 PM2021-11-11T14:35:01+5:302021-11-11T14:35:45+5:30

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं, पण अद्याप ठाकरे सरकारने कर कमी केला नाही.

Nawab Malik should be charged with treason, demands Chandrakant Patil | नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, चंद्रकांत पाटलांची मागणी

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, चंद्रकांत पाटलांची मागणी

Next

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची एनआयए(NIA)कडून चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आज चंद्रकांत पाटलांनी माध्यमाशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली.

आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाहीत
यावेळी चंद्रकात पाटील म्हणाले की, नवाब मलिकांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नसल्याचं म्हटलंय. यामुळे एनआयएनं नवाब मलिकांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक-खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या कायदेशीर नोटिशीबद्दल विचारले असता, आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत, आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

ठाकरे सरकारने कर कमी करावा
पुढे म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 आणि 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यानंतर 11 भाजपशासित आणि इतर काँग्रेसशासित राज्यांनीदेखील कर कमी केले आहेत. पण, ठाकरे सरकारने कर कमी करण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही, असंही ते म्हणाले. याशिवाय, दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत यांना बोर्नविटा पिण्याची गरज आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

मुख्यमंत्री सरकारी हॉस्पिटलमध्ये का जात नाहीत ?
पाटील पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना उपचारासाठी सरकारी रुग्णालय का चालत नाही ? मुख्यमंत्री सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत, याचा अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title: Nawab Malik should be charged with treason, demands Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.