नवाब मलिक यांना धमकी
By admin | Published: December 4, 2015 02:04 AM2015-12-04T02:04:51+5:302015-12-04T02:04:51+5:30
गेल्या दोन दिवसापासून सातत्याने रोमानिया, केनिया, तैवान, भूतान आदी देशातून आपणास धमक्याचे फोन येऊ लागले. सकाळीच रोमानियातून रवी पुजारी नावाने आपणास जीवे मारण्याचा
मुंबई : गेल्या दोन दिवसापासून सातत्याने रोमानिया, केनिया, तैवान, भूतान आदी देशातून आपणास धमक्याचे फोन येऊ लागले. सकाळीच रोमानियातून रवी पुजारी नावाने आपणास जीवे मारण्याचा धमकीचा फोन आल्याची माहिती, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. या धमकीची तक्रार आपण मुंबई सहपोलीस आयुक्त यांच्याकडे आपण तक्रार दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मलिक म्हणाले, ‘सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये ‘इएस’ या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे ही ‘इएस’ नावाची व्यक्ती कोण? याची चौकशी करण्याची मागणी आपण केली होती. या मागणीनंतर सध्या आपण अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश करत असून, अशा पद्धतीने धमक्या देऊन आपणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आपण अशा कोणत्याही स्वरूपाच्या धमक्यांना घाबरणार नसून, विविध घोटाळ्यांचा पर्दाफाश करतच राहणार,’ असे मलिक यांंनी सांगितले.