नवाब मलिकांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली, म्हणूनच त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार -  जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:19 PM2022-02-23T12:19:20+5:302022-02-23T12:22:06+5:30

Jayant Patil : आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Nawab Malik took out many cases, that's why this is a way to get them in trouble - Jayant Patil | नवाब मलिकांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली, म्हणूनच त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार -  जयंत पाटील

नवाब मलिकांनी अनेक प्रकरणे बाहेर काढली, म्हणूनच त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार -  जयंत पाटील

Next

सोलापूर :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

ईडीने स्वतःचे पोलीस आणून कोणीतही माहिती न देता घेऊन जाणे म्हणजे सर्व गोष्टींची पायमल्ली आहे. अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी काही प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचा प्रकार आहे. कोणते प्रकरण आहे याची माहिती नाही. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचा प्रकार सुरु आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

यातबरोबर, नवाब मलिक यांनी दाऊद व्यवहार आरोपांबद्दल उत्तर दिले आहेत. यंत्रणाचा गैरवापर होतो, अति गैरवापर सुरु आहे. विरोधकांना निस्तोनाबूत करण्याचे हे काम आहे. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम सुरू झाले आहे, असे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. जवळपास 4 तास झाले नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे.  

काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे समोर आणत नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींसोबत व्यवहार  केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपांबाबतच्या चौकशीसाठीच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.  

Web Title: Nawab Malik took out many cases, that's why this is a way to get them in trouble - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.