नक्षलवाद्यांचे हल्ले वैफल्यग्रस्ततेतून : बिपिन रावत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 03:27 PM2018-10-31T15:27:39+5:302018-10-31T16:01:29+5:30
मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जिथे मराठा सैनिक तैनात असतो तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे सांगत नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले म्हणजे वैफल्यग्रस्तातून होत असल्याचे मत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जिथे मराठा सैनिक तैनात असतो तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे सांगत नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले म्हणजे वैफल्यग्रस्तातून होत असल्याचे मत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केले.
कोल्हापूरात बुधवारी माजी सैनिकांच्या मेळाव्यास भेट देण्यासाठी आले असता, त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. भारतीय सैनिक प्रत्येकवेळी नक्षलवाद्यांचे हल्ले चोखपणे परतावून लावत आहेत, असे त्यांनी सांगितले.
बिपीन रावत यांनी मराठा लाईट इन्फट्रीच्या गौरवशाली इतिहासाचा दाखला दिला. मराठा लाईट इन्फट्रीचा इतिहास मोठा असून या इन्फट्रीला २५० वर्ष पूर्ण झाली. रणभूमीवर इतिहासात असे एकही युद्ध नाही, जे ११४ मराठा रेजिमेंटला मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.
माजी सैनिकांना भेटायची संधी मला मिळाली आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे देश चालत आहे याचा अभिमान असल्याचे सांगत भारतीय लष्कराचा इतका प्रसार करा की जास्तीत जास्त तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन लष्कर मजबूत व्हावे असे आवाहन त्यांनी केले.