नक्षलविरोधी संयुक्त कारवाईस यश

By Admin | Published: January 19, 2016 03:42 AM2016-01-19T03:42:00+5:302016-01-19T03:42:00+5:30

नक्षलवाद्यांविरुद्ध महाराष्ट्राचे पोलीस आंतरराज्य कारवाई सुरू करायच्या एक दिवस आधी छत्तीसगढच्या पोलीस तुकड्यांना आपल्या पोलीस चौक्यांवर बोलावून घेतात

Naxal joint action proceedings | नक्षलविरोधी संयुक्त कारवाईस यश

नक्षलविरोधी संयुक्त कारवाईस यश

googlenewsNext

डिप्पी वांकाणी,  मुंबई
नक्षलवाद्यांविरुद्ध महाराष्ट्राचे पोलीस आंतरराज्य कारवाई सुरू करायच्या एक दिवस आधी छत्तीसगढच्या पोलीस तुकड्यांना आपल्या पोलीस चौक्यांवर बोलावून घेतात. त्यामुळे अधिकार क्षेत्राचा वाद निर्माण न होता कारवाई करता येते. वरिष्ठ नक्षलवादी पोलिसांच्या कारवाईदरम्यान छत्तीसगढच्या सीमेत नेहमीच घुसखोरी करतात. कारण तेथे कित्येक किलोमीटरवर पोलीस चौक्याच नाहीत. नक्षलवाद्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लवकरच सी-६० कमांडोंना दोन अनमॅनड् एरियल व्हेईकल्स (यूएव्ही) मिळणार आहेत, अशी माहिती नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईतील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या महाराष्ट्राच्या कामाला नेहमी अपयश आले आहे कारण महाराष्ट्राच्या पोलिसांना हैदराबाद येथील राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेवर (एनटीआरओ) अवलंबून राहावे लागले आहे. कारण या संघटनेने पाठविलेले यूएव्ही घटनास्थळी पोहोचण्यास कित्येक तास लागतात. ‘आमची नुकतीच दमरनचा ठाण्यात पोलीस महासंचालक आर.के. वीज, पोलीस महानिरीक्षक एस. कल्लुरी आणि ४ ते ५ पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक झाली. आम्ही त्यांना हे सांगितले की, सीमा भागात पोलीस चौक्या नाहीत तर आपण संयुक्तपणे कारवाई करायला हवी. ही व्यवस्था यशस्वीही ठरली. या उपायामुळे महिला दलमच्या कमांडरसह दोन नक्षलवादी चकमकीत ठार झाले. ही संयुक्त कारवाई सुरू होण्यापूर्वी अधिकारी तळ ठोकून होते, असेही हा अधिकारी म्हणाला.

Web Title: Naxal joint action proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.