नक्षल चळवळीला लगाम!
By admin | Published: December 7, 2014 01:46 AM2014-12-07T01:46:41+5:302014-12-07T01:46:41+5:30
अन्यायाविरुद्ध लढण्याच्या ईर्षेतून पाव शतकापूर्वी पूर्वेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेली नक्षल चळवळ पुढे मात्र हिंसक कारवायांपुरती मर्यादित झाली.
Next
आत्मसमर्पण योजना : 9 वर्षात 446 लोकांनी धरली वेगळी वाट
मनोज ताजने - गोंदिया
अन्यायाविरुद्ध लढण्याच्या ईर्षेतून पाव शतकापूर्वी पूर्वेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेली नक्षल चळवळ पुढे मात्र हिंसक कारवायांपुरती मर्यादित झाली. त्यामुळे महाराष्ट्रात या चळवळीशी जुळलेल्या अनेक युवक-युवतींचा भ्रमनिरास झाला. त्यातच आत्मसमर्पण योजनेतून त्यांना नव्याने जीवन जगण्यासाठी आशेचा किरण दिसला आणि पाहता-पाहता या माध्यमातून गेल्या 9 वर्षात राज्यात 446 नक्षल्यांसह त्यांच्या नेत्यांनी आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यामुळे नक्षल चळवळीला राज्यात लगाम बसत आहे.
महाराष्ट्रात गडचिरोली आणि गोंदिया हे नक्षल जिल्हे म्हणून ओळखले जातात. मात्र, मधल्या काळात चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांतही नक्षल समर्थक आढळून आले. एवढेच नाहीतर पुणो, नाशिकर्पयतही नक्षल्यांचे जाळे पसरत असल्याचे पुरावे पोलीस विभागाला मिळाले होते. गेल्या चार-पाच वर्षात माओवाद्यांशी जुळलेले अनेक ‘मास्टर माईंड’ पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने त्यांचे जाळे पसरण्यास ब्रेक लागला़ बेरोजगारी आणि दारिद्रय़ाला कंटाळून केवळ ‘रोजगार’ म्हणून नक्षल चळवळीत ओढल्या गेलेल्या अनेकांना आपणही सर्वसामान्यांसारखे जीवन जगावे, छोटेखानी संसाराचे रंगविलेले स्वप्न पूर्ण करावे ही सुप्त इच्छा अस्वस्थ करीत होती. अशाच लोकांना नवजीवनाचे स्वप्न दाखविण्याचे काम ‘आत्मसमर्पण योजने’ने केले.
नऊ वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून आतार्पयत 446 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आह़े 2क्13मध्ये 48 तर या वर्षी ऑक्टोबर अखेर्पयत 25 नक्षली व त्यांच्या नेत्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. मिळालेले स्वातंत्र्य खोटे आहे, ख:या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी व विकासासाठी नक्षल चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन करीत आणि आदिवासी बांधवांच्या मागासलेपणाचा फायदा घेत त्यांना या चळवळीत ओढण्याचे काम नक्षल्यांनी केले. अनेक जण बेरोजगारीला पर्याय म्हणून या चळवळीकडे आकर्षित झाले. चळवळीत काम करताना काही युवक-युवती पती-प}ी म्हणूनही राहू लागले. परंतु अंतर्गत शंकेचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे काही वर्षातच त्यांचा भ्रमनिरास झाला.
आर्थिक मदतीसोबत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण
आत्मसमर्पण करणा:या नक्षलवाद्यांना राज्य व केंद्र सरकारकडून आर्थिक मदत व पुनर्वसन करण्यासाठी विविध प्रकारचे साहाय्य केले जाते.
त्यात घरासाठी भूखंड, घरकूल किंवा व्यवसाय उभारणीसाठी बँकेचे अर्थसाहाय्य, शेती करण्यासाठी बैलजोडी, बैलबंडी, डिङोल इंजीन दिले जाते किंवा शेळीपालन व्यवसायासाठी मदत केली जाते. याशिवाय वाहनचालक, शिवणकाम, इलेक्ट्रीक फिटिंग, नळ फिटिंग, गवंडीकाम अशा विविध कामांचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उभारण्यासाठी सक्षम केले जाते.