नक्षल चळवळीला हादरा

By Admin | Published: January 18, 2016 03:52 AM2016-01-18T03:52:55+5:302016-01-18T03:52:55+5:30

प्लाटून कमांडरसह तीन नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर शनिवारी आत्मसमर्पण केले. या नक्षल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

Naxal movement quake | नक्षल चळवळीला हादरा

नक्षल चळवळीला हादरा

googlenewsNext

गडचिरोली : प्लाटून कमांडरसह तीन नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर शनिवारी आत्मसमर्पण केले. या नक्षल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
बाबुराव ऊर्फ पूसू देवू वाचामी
व त्याची पत्न पायकी ऊर्फ गिरीजा ऊर्फ सन्नी मडका बारसे व सुनीता
उर्फ रामको नेतू आतला
अशी आत्मसमर्पित नक्षल्यांची
नावे आहेत. बाबुराव वाचामी हा प्लाटून कमांडर होता. बुक्की, कोडे, बुरकी येथील चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर १२ लाख रुपयांचे बक्षीस होते.
पायकी बारसे ही सीतापूर दलमची सदस्य म्हणून कार्यरत होती. ती कृष्णार, इरूभट्टा चकमक, ताकालूर येथील सरपंचाचा खून, गुमसूर, गुमरक्का येथील जाळपोळ, बोडमा येथील मारहाणीत तिचा सहभाग होता. तिच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.
सुनीता आतला ही चामोर्शी दलम सदस्य म्हणून कार्यरत होती. आबापूर, गोडलवाही, पदाबोरीया चकमक व कोरकोटी, लेखाटोला टँकर जाळपोळ प्रकरणात समावेश होता. हिच्यावरही पोलीस विभागाने दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या तिघांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Naxal movement quake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.