नक्षलवादी चळवळ... अफवांचे पीक... व्यवस्थेला धोका ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 07:34 PM2018-07-16T19:34:04+5:302018-07-16T19:34:20+5:30

विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे नागपूर पावसाळी अधिवेशन कालावधीत विधान भवन येथे प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Naxal movement ... Rumors ... the threat of system! | नक्षलवादी चळवळ... अफवांचे पीक... व्यवस्थेला धोका ! 

नक्षलवादी चळवळ... अफवांचे पीक... व्यवस्थेला धोका ! 

googlenewsNext

नागपूर :विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे नागपूर पावसाळी अधिवेशन कालावधीत विधान भवन येथे प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (1७ जुलै)  दुपारी ४.३० ते ५.४५ यावेळेत संसदीय लोकशाहीपुढे नक्षलवादी चळवळीचे आव्हान आणि अफवांचे पीक...व्यवस्थेला धोका, या महत्त्वाच्या विषयांवर पत्रसंवाद कार्यशाळेच्या माध्यमातून विचारमंथन होणार आहे. 
शिवाजीराव बोडखे (भा.पो.से.), सहपोलीस आयुक्त, नागपूर तसेच नक्षलवाद विरोधी पथकाचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि श्री. ब्रिजेश सिंह (भा.पो.से.), सचिव तथा महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर गुन्हे) हे सादरीकरणासह या समस्यांचा उहापोह करतील.
नक्षलवादी चळवळ ही देशापुढे मोठे आव्हान असून सध्या ही चळवळ अनेक राज्यांमध्ये फोफावत आहे. या नक्षल चळवळीमुळे लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. या चळवळीचे कार्यक्षेत्र पूर्वी फक्त आदिवासी दुर्गम भागापुरते मर्यादित होते. परंतु सध्या शहरातील सुशिक्षित तरुण पिढी देखील या चळवळीकडे आकर्षित होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून नक्षलवादी चळवळीचा प्रसार म्हणजे एकप्रकारे संसदीय लोकशाहीपुढे नक्षलवादी चळवळीने उभे केलेले आव्हान आहे. तसेच आजच्या युगात जनमानसात समाजमाध्यमे प्रभावी भूमिका बजावत आहेत. समाजमाध्यमांद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अनुचित माहितीवर तसेच निर्माण होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवत केलेल्या आततायी कृत्यांमुळे समाजस्वास्थ्य बिघडत आहे. एकंदरितच अफवांच्या पीकामुळे सामाजिक सलोखा आणि 
कायदा-सुव्यवस्था याला धोका निर्माण होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उपरोक्त दोन विषयांशी निगडीत अनुभवसंपन्न आणि तज्ज्ञ असे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याची, प्रत्यक्ष कार्यक्षेत्राशी संबंधित त्यांचे कृतीप्रवण चिंतन ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे. 

Web Title: Naxal movement ... Rumors ... the threat of system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.