हत्याराच्या आकर्षणाने ‘ती’ झाली नक्षलवादी

By admin | Published: July 27, 2016 01:24 PM2016-07-27T13:24:50+5:302016-07-27T13:31:18+5:30

एटापल्ली तालुक्याच्या झारेवाडासारख्या दुर्गम व अतिदुर्गम गावात राहणारी अंकिता ऊर्फ जानकी वत्ते पदा हिच्या गावात नेहमीच नक्षलवाद्यांचा वावर राहायचा.

Naxalism has become the 'she' of the killings | हत्याराच्या आकर्षणाने ‘ती’ झाली नक्षलवादी

हत्याराच्या आकर्षणाने ‘ती’ झाली नक्षलवादी

Next
>ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. २७ -  एटापल्ली तालुक्याच्या झारेवाडासारख्या दुर्गम व अतिदुर्गम गावात राहणारी अंकिता ऊर्फ जानकी वत्ते पदा हिच्या गावात नेहमीच नक्षलवाद्यांचा वावर राहायचा. नक्षलवादी गावात आले की सभा घेऊन गावकºयांना बड्याबड्या बाता द्यायचे. त्यांच्या खांद्यावर लटकविलेले शस्त्र याचे आकर्षण  अगदी लहान वयातच अंकिता ऊर्फ जानकीला वाटू लागले. असे शस्त्र आपल्याही हातात यायला हवे, असे तिचे स्वप्न होते. याच स्वप्नाने वाहवत केवळ हत्याराचे आकर्षण म्हणून अंकित स्वच्छेने दलममध्ये भरती झाली. जुलै २०१० पासून ते मार्च २०१२ पर्यंत ती दलममध्ये कार्यरत राहिली. ती गट्टा दलम, कंपनी क्र. १० व सप्लाय टीममध्ये काम करीत होती. तिने याच काळात तोळगट्टा, नेलगुंडा, कोडसेपल्ली, कांदोळी/बुर्गी, डोकेनटोला व नारगुंडा या चकमकीमध्ये सहभाग घेतला व शस्त्रारच्या आकर्षणाच्या भरवशावर बलाढ्य पोलीस यंत्रणेला जेरीस आणण्याचे काम तिने हाती घेतले. याचदरम्यान तिच्या शिरावर दोन लाखांचे बक्षीस पोलीस यंत्रणेने जाहीर केले होते. अखेरीस तिने नक्षलवाद्याच्या या सर्व कारवायांना कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला व तिने गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्या आत्मसमर्पणाने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसेल, असा विश्वास पोलिसांना आहे. 
 
वयाच्या १५ व्या वर्षी ते दलममध्ये झाले दाखल 
 
गडचिरोली पोलीस दलामसमोर जागेश ऊर्फ दुल्लुराम जिटीराम हिडको व जीवन ऊर्फ छबीलाल बिपतराम मडावी या दोघांनी आत्मसपर्मण केले. वयाच्या अगदी १५ व्या वर्षी हे दोघेही नक्षल चळवळीत दाखल झाले व माओवादी या दोघांकडूनही पोलिसांची भीती दाखवून भरपूर काम करवून घेत होते, अशी माहिती त्यांनी आत्मसमर्पणनंतर पोलीस दलासमोर विशद केली. जागेशचा जवळजवळ सहा घटनांमध्ये सहभाग होता. देवसूर जंगल परिसरात २०१५ मध्ये झालेली चकमक, मुरूमगाव येथे रेशन धान्य दुकानदाराचा खून, सावरगाव-कोहका मार्गावर दोन इसमाचा खून, मोठा झेलिया येथील कुमोटी नामक पुजाºयाला मारहाण, गजामेंढा-सावरगाव मार्गावर पीएलजीए सप्ताहात बॅनर बांधणे, पोस्टर बांधणे आदी घटनांमध्ये जागेश हिडकोचा सहभाग होता. जागेशसारखाच वयाच्या १५ व्या वर्षी जीवन ऊर्फ छबीलाल मडावी हा ही नक्षल दलममध्ये दाखल झाला. त्याचाही परसवाडी चकमक व कुलभट्टी-रामपूर मार्गावर बॅनर, पोस्टर बांधण्याच्या कामात सहभाग होता. ही बाब पोलिसांनी आत्मसमर्पणानंतर स्पष्ट केली आहे.

Web Title: Naxalism has become the 'she' of the killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.