‘नक्षलवाद्यांच्या खब:यांना यापुढे भरघोस बक्षिसे’
By admin | Published: August 9, 2014 01:47 AM2014-08-09T01:47:20+5:302014-08-09T01:47:20+5:30
नक्षलग्रस्त जिलंमध्ये नक्षलवाद्यांविषयी माहिती देणा:या खब:यांना 2 लाखांपासून एक कोटी रुपयांर्पयतचे बक्षीस देण्याची घोषणा गृह विभागाने शुक्रवारी केली.
Next
>मुंबई : गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि भंडारा या सहा नक्षलग्रस्त जिलंमध्ये नक्षलवाद्यांविषयी माहिती देणा:या खब:यांना 2 लाखांपासून एक कोटी रुपयांर्पयतचे बक्षीस देण्याची घोषणा गृह विभागाने शुक्रवारी केली.
भाकपा (माओवादी) ग्रुपचा सरचिटणीस किंवा पॉलिट ब्युरो सरचिटणीसाबद्दल माहिती देणा:याला एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. पॉलिट ब्युरोचा सदस्य, विभागीय ब्युरो सचिव, सेंट्रल मिलिटरी कमिशन सचिवाविषयी माहिती देणा:याला 6क् लाख रुपये दिले जातील.
केंद्रीय समिती सदस्य, विभागीय ब्युरो सदस्य, सेंट्रल मिलिटरी कमिशन सदस्य, सेंट्रल टेक्निकल टीम सचिव, गोल्डन कॉरिडॉर समिती सचिव, स्पेशल झोनल समिती सचिव, स्टेट मिलिटरी कमिशन सचिव यांची माहिती देणा:याला 5क् लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
स्पेशल झोनल समिती सदस्य, स्टेट मिलिटरी समिती सदस्य, राज्य समिती सदस्य, गोल्डन कॉरिडॉर समिती सदस्य, विभागीय मिलिटरी कमांड सचिव आणि स्टे टेक्निकल ग्रुपची माहिती देणा:याला 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
विभागीय समिती सदस्य, एरिया समिती सचिव, कंपनी दलम उपकमांडरसाठी 2क् लाख, विभागीय समिती सदस्य, कंपनी दलम
प्रमुख, कंपनी दलम कमांडर,
विभागीय मिलिटरी कमांड सदस्यासाठी 16 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. या शिवाय 2 लाख रुपयांपासून 12 लाखार्पयतची रक्कम बक्षिसादाखल दिली जाणार आहे.
या आधी खब:यांना दिल्या जाणा:या बक्षिसांची रक्कम अतिशय कमी होती. नोव्हेंबर 2क्क्6नंतर या रकमेत वाढ करण्यात आलेली
नव्हती. खबरे बरेचदा जिवाची बाजी लावून, जोखीम पत्करून नक्षलवाद्यांबद्दल माहिती देतात हे लक्षात घेता आता बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)