“NCPबद्दल बोलतील तर आम्हालाही व्हिडिओ लावावे लागतील”; उद्धव ठाकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 08:36 PM2023-05-21T20:36:16+5:302023-05-21T20:37:05+5:30
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद शमताना दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra Politics: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धूळ चारल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत नवउत्साह संचारला आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने उद्धव ठाकरेंना इशारा देत, पक्षातील वाचाळवीरांना आवर घालण्याची विनंती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अजित पवार आणि सुषमा अंधारे यांच्यात काही दिवसांपूर्वी आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शरद पवार यांच्या राजीनामा दिला, त्यानंतर तो मागे घेतला. या काळातही संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडल्याचे पाहायला मिळाले. सुषमा अंधारे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर केल्या जाणाऱ्या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे.
NCPबद्दल बोलतील तर आम्हालाही व्हिडिओ लावावे लागतील
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, आदरणीय उद्धवजी,आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे,विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. रा.कॉ.पक्ष संकटकाळात आपल्या सोबत उभा राहिलाय . गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टॅगही केले आहे.
आदरणीय उद्धवजी,आपल्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे,विनंती ही की आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. रा.कॉ.पक्ष संकटकाळात आपल्या सोबत उभा राहिलाय . गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही VDO लावावे लागतील.@uddhavthackeray@AUThackeray
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 21, 2023