Maharashtra Politics: चित्राताई किती त्रागा करून घ्याल? तुमचा पक्ष राजरोस मलीन होतोय; अमोल मिटकरींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 07:53 PM2022-12-16T19:53:18+5:302022-12-16T19:54:31+5:30

Maharashtra Politics: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

ncp amol mitkari criticised bjp chitra wagh over dr babasaheb ambedkar issue | Maharashtra Politics: चित्राताई किती त्रागा करून घ्याल? तुमचा पक्ष राजरोस मलीन होतोय; अमोल मिटकरींची टीका

Maharashtra Politics: चित्राताई किती त्रागा करून घ्याल? तुमचा पक्ष राजरोस मलीन होतोय; अमोल मिटकरींची टीका

Next

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. यातच संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानावरुन भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. चित्राताई किती त्रागा करून घ्याल, असा सवालही मिटकरी यांनी केली आहे. 

राजकारणात शॉर्टकट नाही. तो शिकण्यासाठी कोणता क्लासही नसतो. राजकारण हे बघूनच शिकायचे असते, असे सांगताना चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. दररोज सकाळी सर्वांना सर्वज्ञान देणारे हे सामान्य ज्ञानी कसे हे कळले नाही, अशा शब्दात राऊत यांचा समाचार त्यांनी घेतला. यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. 

चित्राताई किती त्रागा करून घ्याल? तुमचा पक्ष राजरोस मलीन होतोय

अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. आदरणीय चित्राताई किती त्रागा करून घ्याल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महुलाच झालाय हे सर्वांनाच माहिती आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड विल संसदेत मांडल होत, निदान ते तरी वाचलं असेल अशी अपेक्षा करतो. कशातही राजकारण करू नका तुमचा पक्ष राजरोस मलीन होतोय,काळजी घ्या, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. 

दरम्यान, लग्नाचे अमिष दाखवून धर्मांतरण करण्याचे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. निसर्गचक्र फार वेगळ झालय झालय. मुली १२ व्या आणि १४ व्या वर्षी वयात येत आहेत. १४ व्या १५ व्यावर्षी वयात मुली गर्भवती होत आहेत, हे अतिशय गंभीर बाब आहे. तसेच मुलींना फोर्स फुली पळवून नेणे, अशा मुलीच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी आपल्याकडे कोणताच कायदा नाही आहे. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लव जिहाद सारखा कायदा व्हायला हवा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp amol mitkari criticised bjp chitra wagh over dr babasaheb ambedkar issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.