“मुख्यमंत्री शिंदे साहेब, एवढी माणसं गेली, सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 03:20 PM2023-04-17T15:20:48+5:302023-04-17T15:23:15+5:30

Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेल्या दुर्दैवी घटनेवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे.

ncp amol mitkari criticised shinde and fadnavis govt over maharashtra bhushan award sad incident | “मुख्यमंत्री शिंदे साहेब, एवढी माणसं गेली, सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही”

“मुख्यमंत्री शिंदे साहेब, एवढी माणसं गेली, सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही”

googlenewsNext

Maharashtra Bhushan Award: राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. त्यापैकी काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील १२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यावरून आता ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेब, एवढी माणसे गेली, सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, या शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात जाहीर केली असून उपचार सुरू असलेल्यांचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी एवढा खर्च करण्यात आला. पाण्यासारखा पैसा ओतला. मग लोकांसाठी चांगली व्यवस्था का करता आली नाही, अशी विचारणा अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री शिंदे साहेब, सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही
 
केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी चांगली व्हीआयपी व्यवस्था होती. मात्र भक्त संप्रदायाचे सदस्य लाखोंच्या संख्येने येतील हे प्रशासनाला कळले नाही का? मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकले आहे. या घटनेचे राजकारण करू नये म्हणून सांगितले गेले. राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. पण शिंदे साहेब, एवढी माणसे मृत्यू पावत असतील तर सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे सांगत या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. राज्य सरकारच या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे. सरकारच या कार्यक्रमाचे आयोजक आहे. याबाबत राज्यपालांना पत्र लिहिणार आहे, अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली. तत्पूर्वी, कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: ncp amol mitkari criticised shinde and fadnavis govt over maharashtra bhushan award sad incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.