“लाज शरम भाजपत असेल तर वाचाळविरांना गप्प करतील”; अमोल मिटकरींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 07:21 PM2023-05-27T19:21:16+5:302023-05-27T19:22:14+5:30

Maharashtra Politics: जितके खालच्या पातळीवर बोलता येईल तेवढे बोलण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे.

ncp amol mitkari replied bjp nitesh rane and gopichand padalkar over criticism | “लाज शरम भाजपत असेल तर वाचाळविरांना गप्प करतील”; अमोल मिटकरींची घणाघाती टीका

“लाज शरम भाजपत असेल तर वाचाळविरांना गप्प करतील”; अमोल मिटकरींची घणाघाती टीका

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आहेत. तर भाजप आणि शिंदे गटाचे नेते महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. यातच आता लाज शरम भाजपत असेल तर वाचाळविरांना गप्प करतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे ठाकरे गटावर जहरी टीका करत आहेत. ही टीका करताना अनेक दावे, खुलासे, गौप्यस्फोट करताना पाहयला मिळत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तसेच पवार कुटुंबावर हल्लाबोल करताना दिसत आहेत. या दोन्ही नेत्यांना अमोल मिटकरी यांनी उत्तर देताना जोरदार निशाणा साधला आहे. 

लाज शरम भाजपत असेल तर वाचाळविरांना गप्प करतील

पवार कुटुंबावर बोलण्यासाठी सुपारी घेतलेले सुपारी बहाद्दर भाजपमध्ये आहेत. त्यातील एक गोपीचंद पडळकर. यांना सांगितले आहे की, शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार यांच्यावर बोलायचे. मग कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण पडळकरांना ज्ञान नाही की, कॅबिनेटमध्ये जायला अक्कल आणि बुद्धी लागते. कितीही जहरी टीका केली तर जहर ओकणाऱ्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिले जात नाही. किमान तेवढी लाज शरम भाजपत असेल तर ते या वाचाळविरांना गप्प करतील. नितेश राणे असतील किंवा हे महोदय गोपीचंद पडळकर असतील यांच्यात कॅबिनेट मंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू आहे. जितके खालच्या पातळीवर बोलता येईल तेवढे बोलण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे, या शब्दांत अमोल मिटकरींनी सुनावले. 

दरम्यान, देशभरात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटावरून देशात राजकारणही जोरात सुरु आहे. असे असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंचर जिल्ह्यात लव्ह जिहाद प्रकरण घडल्याचा दावा केला आहे. पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना समोर आणत भूमिका मांडली. यावेळी,  राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडल्या नाहीत, मला लव्ह जिहाद माहिती नाही असं म्हणणारे पीडित तरुणीला आणि कुटुंबीयांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेणार का, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

 

Web Title: ncp amol mitkari replied bjp nitesh rane and gopichand padalkar over criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.