“सदाभाऊंचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस”; शरद पवारांवरील टीकेवर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 02:54 PM2022-03-29T14:54:44+5:302022-03-29T14:56:10+5:30

आग लावण्याचे काम भाजप करत असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

ncp amol mitkari replied sadabhau khot over sharad pawar criticism | “सदाभाऊंचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस”; शरद पवारांवरील टीकेवर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

“सदाभाऊंचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस”; शरद पवारांवरील टीकेवर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदभाऊ खोत यांनी शरद पवारांनी आडनाव बदलून आगलावे करावे, असे म्हटले होते. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे. 

शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाईल तिथे आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचे. त्यांचे सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेले आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावे. हे राज्य होरपळून निघाले असून आता थांबले पाहिजे, असे सदाभाऊ खोत म्हणाले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. 

मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत

शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सूर्यासमोर बोलत आहोत… तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतके ज्ञान सदाभाऊंना असावे. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वत: बोलत नाहीत. यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. आग लावण्याचे भारतातील काम भाजप करत आहे. आपलाच पक्ष आग लावण्याचे काम करत असून शरद पवारांचे नाव घेत आहेत. भाजपपासून महाराष्ट्राला धोके निर्माण झाले असून, आग कोण लावत आहे हे सर्वांना माहिती आहे. सदाभाऊंच्या बोलण्याला पक्षात काही महत्व नाही. पुढील आमदारकी मिळावी, यासाठी त्यांची ही धडपड आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp amol mitkari replied sadabhau khot over sharad pawar criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.