Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 10:58 AM2022-08-04T10:58:47+5:302022-08-04T11:00:08+5:30

Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार असून, या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.

ncp amol mitkari slams eknath shinde and devendra fadnavis govt over cabinet expansion delay | Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

Next

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. एकीकडे शिगेला पोहोचलेल्या सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात गेला असून, दुसरीकडे नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तारीख पे तारीख सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून  राज्य अधोगतीकडे नेत असल्याची टीका केली आहे. 

नव्या शिंदे-भाजप सरकार सत्तेत येऊन महिना लोटला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडत नाही. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांमध्ये एकमत होत नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा करण्यात येत आहे. उलट येत्या दोन ते तीन दिवसांत निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा कयास बांधला जात आहे. यातच अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत शिंदे गटाला टोला लगावला आहे. 

फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात

शिंदे सरकारला ३५ दिवस पूर्ण. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागुन आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, अशी टीका करणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. दुसरीकडे, गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी राजभवनात तयारी सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यात भाजपा-शिंदे गट यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. त्यात भाजपाचे ११६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रिपद सोडून बंडात सहभागी होणाऱ्या नेत्यांना मंत्री बनवावेच लागणार आहे. त्याचसोबत प्रादेशिक समतोल साधणे नव्या सरकारसमोर आव्हान आहे. नेमका मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. 
 

Web Title: ncp amol mitkari slams eknath shinde and devendra fadnavis govt over cabinet expansion delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.