Amol Mitkari : "केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:46 AM2022-07-14T11:46:32+5:302022-07-14T11:55:09+5:30

NCP Amol Mitkari Slams Shivsena Deepak Kesarkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

NCP Amol Mitkari Slams Shivsena Deepak Kesarkar Over his statement | Amol Mitkari : "केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या"

Amol Mitkari : "केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या"

Next

मुंबई - शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (Shivsena Deepak Kesarkar) यांनी शिवसेना आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाच हात होता, असा दावा केला आहे. तसेच आपला पक्ष मोठा व्हावा तो सत्तेवर यावा ही पवाराचा इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना कधीच राष्ट्रवादीचा विचारधारा पटलेली नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिक राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना फुटलेली आहे त्यामध्ये शरद पवारांचाच हात राहिला आहे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, असा घणाघात दीपक केसरकर यांनी याआधी केला. यावरून राष्ट्रवादीने आता केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"केसरकर सध्या तुम्ही हवेत आहात, उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "केसरकर साहेब सध्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणून आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही" असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

दीपक केसरकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. अहो केसरकर किती बोलता शरद पवारांविरुद्ध... एकेकाळी शरद पवारांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच २०१४ला मीच साहेबांचा निरोप घेऊन आलो होतो. जिथे आहात तिथे सुखी राहा, असं म्हणत खाजवून खरूज काढू नका, असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.

बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी शिवसेना फोडून शरद पवारांनी त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं केसरकर म्हणाले. जनतेला कुणीच गृहीत धरू नये हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. त्यांना जनतेची नस माहित आहे म्हणूनच ते शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र यायला हवी असं म्हणाले. नाहीतर राष्ट्रवादीनं एकट्यानं निवडून यावं, कारण त्यांना गेल्या अडीच वर्षात सत्तेचं टॉनिक मिळालं आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला होता. 

Web Title: NCP Amol Mitkari Slams Shivsena Deepak Kesarkar Over his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.