Amol Mitkari on Sadabhau Khot: “सदाभाऊंमुळे हॉटेल मालकाच्या जीवाला धोका; पोट फुटेस्तवर खाल्लं, आता बिलपण द्या”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 02:12 PM2022-06-17T14:12:45+5:302022-06-17T14:13:16+5:30

Amol Mitkari on Sadabhau Khot: शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तवर आंदोलन करा आणि पवारांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला.

ncp amol mitkari taunts sadabhau khot over hotel owner bill issue | Amol Mitkari on Sadabhau Khot: “सदाभाऊंमुळे हॉटेल मालकाच्या जीवाला धोका; पोट फुटेस्तवर खाल्लं, आता बिलपण द्या”

Amol Mitkari on Sadabhau Khot: “सदाभाऊंमुळे हॉटेल मालकाच्या जीवाला धोका; पोट फुटेस्तवर खाल्लं, आता बिलपण द्या”

Next

मुंबई: पंचायत राज्य समिती दौऱ्यानिमित्त रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सांगोला दौऱ्यावर आले होते. नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांचा गराडा होता. परंतु सदाभाऊ खोत कारमधून खाली उतरताच मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांना जाब विचारू लागले. सन २०१४ चे हॉटेल बिल आहे ते द्या आणि पुढे जावा असे म्हणून त्यांना खोत यांना रोखले. या प्रकरणी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे. 

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताना, राष्ट्रवादीला सांगतो, बदमाश गुन्हेगाराला माझ्या अंगावर घालून कुभांड रचून आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करत असाल तर हे यशस्वी होणार नाही. निश्चितपणे रयत क्रांती संघटना याचा मुकाबला करेल. संघर्ष अटळ आहे, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला.

पोट फुटेस्तोवर खाल्लं, आता बिलपण द्या

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हॉटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण होतोय अशी सगळीकडे चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तव आंदोलन करा . आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा, असे खोचक ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. तर, यामागे लाल टॉमेटोसारखे गाल असलेला नेता कोण आहे त्याचे नाव वेळ आली की सांगेन. आजपासून त्याचे बगलबच्चे बोलायला लागतील, त्यावरून तो कोण हे समजेल. अजून काही लोक त्याठिकाणी होते. या लोकांनी मी ओळखतो. वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत नाही, तो ज्याने दगड मारलाय त्याचा घोट घेतो, कुत्रा दगड मारणाऱ्याला चावतो. माझ्या जिवाला पवार कुटुंबापासून धोका आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे. 

सदाभाऊंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल

गुन्हेगाराला समोर उभे करू नका, हिंमत असेल तर मैदानात समोर या, मी त्या हॉटेल मालका शिनगारेवर गुन्हा दाखल केला आहे. एक कलम लावायला हवे होते. पोलिसांनी त्या गुन्हेगाराची पाठीमागची कारकीर्द शोधावी. त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे. राष्ट्रवादी या पक्षापासून माझ्या जिवाला धोका आहे, हे मी लेखी कळवणार आहे. पवार कुटुंबाकडून धोका आहे. सदाभाऊचा प्राण गेला तरी चालेल परंतू त्यांची ही व्यवस्था, वाडा नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप केला आहे. तो हॉटेलमालक त्याला जेवढे सांगितले जायचे तेवढेच बोलत होता.

दरम्यान, सन २०१४ मध्ये माढा लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत प्रचारावेळी सदाभाऊ खोत यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना जेवायला शिनगारे यांच्या हॉटेलला नेले. त्याठिकाणी हॉटेलचे बिल ६६ हजार ४५० रुपये झाले. मात्र हे पैसे नंतर देतो सांगत ते निघून गेले. तेव्हापासून हॉटेल मालकाला हे पैसे मिळाले नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. त्याचसोबत सदाभाऊ मंत्री झाले तेव्हा पाठपुरावा केला, केवळ देऊ, बघू केले. त्यामुळे हॉटेलमालकाने सदाभाऊ खोत यांना घेरले.
 

Web Title: ncp amol mitkari taunts sadabhau khot over hotel owner bill issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.