Amol Mitkari : "आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था"; मिटकरींनी ट्विट केला 'तो' Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:17 AM2022-12-22T11:17:50+5:302022-12-22T11:26:07+5:30
NCP Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भूखंडाचा श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असं म्हणत चौथ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला आहे. आमदारांनी भूखंडाचा श्रीखंड वाटून मिंधे सरकारचा निषेध केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था" असं म्हणत निशाणा साधला आहे. आमदार निवासातील कपबशी धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. "हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था" असं अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.#आझादीकाअमृतमहोत्सव. pic.twitter.com/pi5rJnJxfm
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 21, 2022
आझादी का अमृतमहोत्सव हा हॅशटॅग देखील मिटकरींनी वापरला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर "घेतले खोके, भूखंड ओके... दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे... राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव... धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो... बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे... राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या...महापुरुषांचा अपमान करणार्या भाजप सरकारचा धिक्कार असो...भूखंडाचा श्रीखंड खाणार्या सरकारचा धिक्कार असो... भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री...गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न" अशा जोरदार घोषणा देत आजही दणाणून सोडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"