कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:18 PM2024-10-23T14:18:26+5:302024-10-23T14:31:08+5:30
Hasan Mushrif : कागलचा श्रावण बाळ म्हणून ओळख असलेल्या हसन मुश्रीफ यांनाही कागल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Maharashtra Elections 2024: मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) पहिली यादी जाहीर झाली आहे. ३८ उमेदवारांची पहिली यादी अजित पवार गटाने जाहीर केली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार आहेत. तर कागलचा श्रावण बाळ म्हणून ओळख असलेल्या हसन मुश्रीफ यांनाही कागल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
गेली अनेक वर्ष कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या हसन मुश्रीफ यांना यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. मधल्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपकडून अनेक आरोप झाले. तसेच, ईडीची चौकशी झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि शरद पवारांसाठी डोळ्यात अश्रु आणणारे हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या गटात गेले. त्यामुळे कागलमध्ये महायुतीचे तिकीट त्यांनाच मिळणार, हे जवळपास निश्चित झाले होते. अजित पवार यांनीही कागलमध्ये झालेल्या सभेत हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता विधानसभेसाठी कागलमधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांनी महायुतीत एन्ट्री केल्यानंतर भाजप नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी फुंकली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर मात केली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत समरजित घाटगे यांनी परिश्रम घेऊन मतदारसंघात मोर्चेबांधणी केली असली तरी भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी तुतारी फुंकली आहे. त्यामुळे कागलच्या राजकारणात रंगत निर्माण झाली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या लढाईत कोण बाजी मारणार? याबद्दल उलट सुलट चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
बारामती- अजित पवार
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
अमरावती- सुलभा खोडके
इंदापूर- दत्तात्रय भरणे
पिंपरी- अण्णा बनसोडे
पाथरी- निर्मला विटेकर
मावळ - सुनील शेळके
येवला- छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ
सिन्नर - माणिकराव कोकाटे
श्रीवर्धन - अदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश सोळंखे
वाई - मकरंद पाटील
खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर - संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले- किरण लहामटे
वसमत – राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज अहिरे
चंदगड- राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर- राजू कारेमोरे
पुसद- इंद्रनील नाईक
नवापूर- भरत गावित
मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला