राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची यादी जाहीर, रोहित पवार, छगन भुजबळांसह...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 10:40 PM2019-10-02T22:40:36+5:302019-10-03T00:20:06+5:30
मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ,
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही 77 जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पंढरपूर भारत भालके, श्रीवर्धनमधून खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे, मुरबाड येथून प्रमोद हिंदुराव, कोरेगाव शशिकांत शिंदे, कल्याण पूर्व प्रकाश तरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ, ठाणे मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आलं आहे.
या 77 जणांच्या पहिल्या यादीत विद्यमान 19 विधानसभा आणि 1 विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधून नवीन चेहर्याला संधी देण्यात आली आहे. शिवाय या यादीत नव्याने प्रवेश केलेले कॉंग्रेस, शिवसेना,भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पहिल्या यादीतच राष्ट्रवादीने अनेक तरुण व नवीन चेहर्यांना संधी दिल्याने भाजप - सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/mpEvJNAtz9
— Lokmat (@MiLOKMAT) October 2, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची संपूर्ण यादी
1. सिंदखेडा – संदिप बेडसे
2. चोपडा – जगदिश वळवी
3. जळगाव ग्रामीण – पुष्पा महाजन
4. अमळनेर – अनिल भाईदास पाटील
5. एरंडोल – डॉ. सतिश पाटील
6. चाळीसगाव – राजीव देशमुख
7. पाचोरा – दिलीप वाघ
8. जामनेर – संजय गरुड
9. सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे
10. मुर्तिजापूर (अ.जा.) – रविकुमार राठी
11. हिंगणघाट – राजू तिमांडे
12. काटोल – अनिल देशमुख
13. हिंगणा – विजय घोडमारे
14. पुसद – इंद्रनिल मनोहर नाईक
15. किनवट – प्रदिप नाईक
16. लोहा – दिलीप शंकरअण्णा धोंडगे
17. वसमत – चंद्रकांत नवघरे
18. जिंतूर – विजय भांबळे
19. घनसावंगी – राजेश टोपे
20. बदनापूर (अ.जा.) – बबलू चौधरी
21. भोकरदन – चंद्रकांत दानवे
22. कळवण (अ.जा.) – नितीन पवार
23. येवला – छगन भुजबळ
24. सिन्नर – माणिकराव कोकाटे
25. निफाड – दिलीप बनकर
26. दिंडोरी (अ.जा.) – नरहरी झिरवळ
27. पंढरपूर - भारत भालके
28. फलटण - दीपक चव्हाण
29. वाई - मकरंद जाधव पाटील
30. कोरेगाव - शशिकांत शिंदे
31. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
32. पाटण - सत्यजीत पाटणकर
33. सातारा - दीपक पवार
34. दापोली - संजय कदम
35. गुहागर - सहदेव बेटकर
36. चिपळूण - शेखर निकम
37. रत्नागिरी - सुदेश मयेकर
38. सावंतवाडी - बबन साळगावकर
39. राधानगरी - के. पी. पाटील
40. कागल - हसन मुश्रीफ
41. इस्लामपूर - जयंत पाटील
42. शिराळा - मानसिंग नाईक
43. तासगाव-कवठे-महांकाळ - सुमन आर. पाटील
44. विक्रमगड (अ.ज) - सुनिल भुसारा
45. शहापूर (अ.ज) - दौलत दरोडा
46. मुरबाड - प्रमोद हिंदुराव
47. उल्हासनगर - भरत गंगोत्री
48. कल्याण पूर्व - प्रकाश तरे
49. मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड
50. विक्रोळी - धनंजय पिसाळ
51. दिंडोशी - विद्या चव्हाण
52. अणुशक्ती नगर - नवाब मलिक
53. श्रीवर्धन - अदिती तटकरे
54. जुन्नर - अतुल बेनके
55. आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील
56. शिरूर - अशोक पवार
57. दौंड - रमेश थोरात
58. इंदापूर - दत्तात्रय भरणे
59. बारामती - अजित पवार
60. वडगाव शेरी - सुनिल टिंगरे
61. खडकवासला - सचिन दोडके
62. पर्वती - अश्विनी कदम
63. हडपसर - चेतन तुपे
64. अकोले (अ.ज) - डॉ. किरण लहामटे
65. कोपरगाव - आशुतोष काळे
66. शेवगाव - प्रताप ढाकणे
67. पारनेर - निलेश लंके
68. अहमदनगर शहर - संग्राम जगताप
69. कर्जत-जामखेड - रोहित पवार
70. गेवराई - विजयसिंह पंडित
71. माजलगाव - प्रकाश सोळंखे
72. बीड - संदीप क्षीरसागर
73. केज (अ.जा) - पृथ्वीराज साठे
74. परळी - धनंजय मुंडे
75. अहमदपूर - बाबासाहेब पाटील
76. उदगीर (अ.जा) - संजय बनसोडे
77. परांडा - राहुल मोटे