Chhagan Bhujbal Mumbai: "मुंबई म्हणजे...."; छगन भुजबळांच्या 'त्या' विधानावरून वाद, अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 04:53 PM2022-12-27T16:53:57+5:302022-12-27T16:54:11+5:30

भुजबळांच्या स्पष्टीकरणात फडणवीस, दरेकर यांचा उल्लेख

NCP Chhagan Bhujbal makes controversial statement about Mumbai gets slammed by BJP then tenders clarification | Chhagan Bhujbal Mumbai: "मुंबई म्हणजे...."; छगन भुजबळांच्या 'त्या' विधानावरून वाद, अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal Mumbai: "मुंबई म्हणजे...."; छगन भुजबळांच्या 'त्या' विधानावरून वाद, अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

googlenewsNext

Chhagan Bhujbal Mumbai: मुंबईबाबत केलेलं वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे ; छगन भुजबळ यांचे नियम ४८ अन्वये सभागृहात स्पष्टीकरणपुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबईच्या प्रश्नांबाबत मुद्दे मांडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी "पूर्वी असे म्हणत असत की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे" असे वक्तव्य केले. भुजबळ यांच्या या विधानावरून वाद झाला नसता तरच नवल आहे. त्यांच्या या विधानानंतर काही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर अखेर छगन भुजबळ यांना या संदर्भात स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. पुरवणी मागण्या दरम्यान मुद्दा पटवून देण्यासाठी वापरलेल्या म्हणीचा चुकीचा अर्थ घेऊ नये, असे ते म्हणाले.

छगन भुजबळ यांनी पुरवणी मागण्या दरम्यान वापरलेल्या म्हणी बाबत महाराष्ट्र विधानसभा नियम ४८ अन्वये स्पष्टीकरण दिले. माझे वक्तव्य हे चुकीचे नाही आणि हे वक्तव्य म्हण म्हणूनच इतिवृत्तात घ्यावे असे छगन भुजबळ यांनी आज विधिमंडळाच्या सभागृहात महाराष्ट्र विधानसभा नियम ४८ अन्वये स्पष्टीकरण दिले. यावेळी छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर यांनी ही आपल्या भाषणात ही म्हण वापरली असल्याचा दाखला दिला. आणि तसे इतिवृत्त सभागृहासमोर ठेवले. तसेच या दाखल्यांप्रमाणे मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे या वाक्याचा म्हण म्हणूनच इतिवृत्तात समावेश करावा असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

या वक्तव्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांच्या स्पष्टीकरणाचे समर्थन केले. तसेच सभागृहात बोलताना म्हणींचा वापर केल्यानंतर त्याचा कुणीही वेगळा अर्थ घेऊ नये असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: NCP Chhagan Bhujbal makes controversial statement about Mumbai gets slammed by BJP then tenders clarification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.