“शरद पवारांचा उरला सुरला गट संपवण्यास दुसऱ्या पक्षाला काही करायची गरज नाही”: छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:30 PM2024-01-05T13:30:39+5:302024-01-05T13:33:09+5:30

Chhagan Bhujbal News: प्रभू श्रीरामांवर जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

ncp chhagan bhujbal reaction over jitendra awhad controversial statement on lord rama | “शरद पवारांचा उरला सुरला गट संपवण्यास दुसऱ्या पक्षाला काही करायची गरज नाही”: छगन भुजबळ

“शरद पवारांचा उरला सुरला गट संपवण्यास दुसऱ्या पक्षाला काही करायची गरज नाही”: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal News: राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर शरद पवार गटातील नेत्यांनी भाष्य करणे टाळले. मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी खोचक टीका केली. 

पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, ‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण आपण ऐकली आहे. पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे. तो पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला. 

पवार साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. तर ते बरोबरच आहे

शरद पवार यांनी सोबत यावे, असे आवाहन अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हे आवाहन केले. अजित पवारांनी सांगितले आहे की, शरद पवार साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. तर ते बरोबरच आहे. शरद पवारसाहेबांनी आशीर्वाद दिले तर सोन्याहून पिवळेच आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, सातत्याने कुणबी प्रमाणपत्र-दाखले चुकीची पद्धतीने सापडत आहेत. लिंगायत आणि इतर समाजाचे पण पाठवत आहेत. कुणाकुणाला दाखले देणार? ओबीसीमध्ये आरक्षण देणार? हळूहळू मागण्या वाढत चालल्या आहेत. संपूर्ण मराठा यांना ओबीसी आरक्षण द्या, असे त्यांचे म्हणणं आहे. नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत. १५ दिवसात सर्वेक्षण होऊ शकत असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय जनगणना करा. कायमचा प्रश्न संपवा ५४ टक्के ओबीसी आहेत त्यात २७ टक्के आम्हाला मिळाले आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे, असा पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी केला. 
 

Web Title: ncp chhagan bhujbal reaction over jitendra awhad controversial statement on lord rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.