प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच; शरद पवारांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 02:31 PM2021-02-13T14:31:02+5:302021-02-13T14:37:26+5:30
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले. असा दावा पवारांनी केला आहे.
सोलापूर - केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी रॅलीतील काही उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर (Red Fort) धुडगूस घातला होता. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. ते सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. (NCP chief Sharad Pawar allegation On BJP about Red Fort Violence)
शरद रावांनी एकदा मनात आणलं तर बरोबर कार्यक्रमच करतात : सुशीलकुमार शिंदे
"प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले, असा दावा करत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे.
केंद्र सरकार केवळ आश्वासनं देतं, प्रत्यक्ष काहीच करत नाही -
दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. मालाला योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार केवळ आश्वासनेच देत आहे. प्रत्यक्षात काहीही करत नाही, असेही पवार म्हणाले.
शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आज सोलापुरात; शेतकरी मेळाव्याला करणार मार्गदर्शन
शरद पवारांनी अचानक यू-टर्न घेतला याचं आश्चर्य - मोदी -
तत्पूर्वी लोकसभेत बोलताना, शरद पवारांनीच याआधी केंद्रीय कृषीमंत्री असताना कृषी कायदे लागू करण्यासाठीचे वक्तव्य केले होते. मग आता विरोध का? असा सवाल करत, त्यांनी कृषी कायद्यांसंदर्भात अचानक यू-टर्न कसा घेतला याचे आश्चर्य वाटते, असे मोदी म्हणाले होते.
PM Narendra Modi In Lok Sabha : कृषी कायद्यांबाबत शरद पवार यांनी अचानक यू-टर्न घेतला याचं आश्चर्य; मोदींची टीका
काय घडलं होतं लाल किल्ल्यावर -
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला नंतर हिंसक वळण मिळाले होते. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स पाडून आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्यावर कब्जा केल्यानंतर आंदोलकांनी येथे आपला झेंडा फडकवला आहे.