Maharashtra Politics: २०२२ या वर्षाने काय दिलं? नव्या २०२३ वर्षांकडून अपेक्षा काय? शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:39 PM2022-12-31T12:39:41+5:302022-12-31T12:40:43+5:30

Maharashtra News: सत्तेत कोणीही असले तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावे लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

ncp chief sharad pawar reaction on how was 2022 year and what expectation from new year 2023 | Maharashtra Politics: २०२२ या वर्षाने काय दिलं? नव्या २०२३ वर्षांकडून अपेक्षा काय? शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’ 

Maharashtra Politics: २०२२ या वर्षाने काय दिलं? नव्या २०२३ वर्षांकडून अपेक्षा काय? शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’ 

googlenewsNext

Maharashtra Politics: सन २०२२ चा आजचा शेवटचा दिवस. ३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाने काय दिले आणि आगामी नवीन २०२३ वर्षातील योजना, आकांक्षा, स्वप्न अपेक्षा यांबाबत ऊहापोह केला जातो. नवीन २०२३ चे स्वागत करण्यासाठी जगभरातील मंडळी सज्ज झाली आहेत. सर्वच क्षेत्रातील मान्यवर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यासंदर्भात मन की बात सांगितली आहे. 

आजची तारीख ३१ डिसेंबर. बरेच काही सांगून जाते. मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या. जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली. आता आपण यातून मुक्त झालो. आता २०२३ वर्ष सुरु होईल. ०१ तारीख उद्याच आहे. अवघा भारत देश औत्सुक्याने नव्या वर्षाची पाहतोय. नववर्ष नव्या आशा, आकांक्षांचे असेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

पाऊस चांगला झाला तर येणारे वर्ष चांगले जाईल

५६ ते ६० टक्के लोक शेती करत आहेत. पाऊस चांगला झाला तर येणारे वर्ष चांगले जाईल. शेती चांगली झाली तर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढणे हे व्यापार उद्योगाला चांगले दिवस आणते. बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात. सुदैवाने मागील वर्ष ठीक गेले.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत महत्त्वाचा निर्यातदार होऊ शकतो. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणा व्हायला हव्यात. सत्तेत कोणीही असले तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावे लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे. येत्या वर्षात त्याला सामोरे जाऊया. नव्या उमेदीने नव्या उत्साहाने नव्या वर्षाचे स्वागत करूयात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुखांबाबत न्यायालयाने निर्णय घेतला. काही सदस्य आतमध्ये आहे. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्याय देवतेने काढला आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: ncp chief sharad pawar reaction on how was 2022 year and what expectation from new year 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.