Maharashtra Politics: वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्या चर्चेत...”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 05:06 PM2023-03-05T17:06:39+5:302023-03-05T17:07:42+5:30

Maharashtra News: चिंचवडमध्ये राहुल कलाटे उभे राहिले नसते तर निकाल वेगळा लागला असता, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

ncp chief sharad pawar reaction over is vanchit bahujan aghadi would the part of maha vikas aghadi | Maharashtra Politics: वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्या चर्चेत...”

Maharashtra Politics: वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्या चर्चेत...”

googlenewsNext

Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावरून अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप तसेच शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने शिवसेना लढणार असेल तर आमचे समर्थन असेल, अशी भूमिका घेतली होती. यानंतर आता पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत केला जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. 

वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर, मला माहिती नाही. मी त्या चर्चेत नसतो. निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि ठाकरे गटाने एकत्र जावे ही आमची विचारधारा आहे. एकत्र बसून निर्णय घेऊ. सध्या तरी मतदारसंघनिहाय आढावा घेतला नाही. पण घ्यावा लागणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला आहे, असे विचारले असता कोण तयारीत आहे, हे निवडणूक निकालातून दिसेल, असे सूचक विधानही शरद पवार यांनी केले. 

चिंचवडमध्ये राहुल कलाटे उभे राहिले नसते तर निकाल वेगळा लागला असता

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि काही महत्त्वाच्या भागातील भाजपची मते कमालीची घटली आहेत. यावरून राज्यकर्त्यांविरोधात नाराजी असल्याचे दिसून येते. दोन्ही मतदारसंघ वेगवेगळे आहेत. चिंचवडमध्ये राहुल कलाटे उभे राहिले नसते तर निकाल वेगळा लागला असता. पण लोकशाहीत प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, विधानसभेला अधिकार आहे. समिती नेमायची की नाही. ज्या लोकांनी समिती नेमायची आणि संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनाच त्या समितीत घेतले आहे. एखाद्याने तक्रार केली असेल आणि तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच जज म्हणून नेमले तर त्याचा निकाल कसा लागेल, हा आमचा प्रश्न आहे, असा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp chief sharad pawar reaction over is vanchit bahujan aghadi would the part of maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.