Maharashtra Political Crisis: “पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले”; पवारांचा कोश्यारींना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 06:01 PM2022-07-10T18:01:48+5:302022-07-10T18:02:49+5:30

Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

ncp chief sharad pawar taunts governor bhagat singh koshyari over floor test directions to maha vikas aghadi govt | Maharashtra Political Crisis: “पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले”; पवारांचा कोश्यारींना खोचक टोला

Maharashtra Political Crisis: “पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले”; पवारांचा कोश्यारींना खोचक टोला

googlenewsNext

औरंगाबाद: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. मात्र, त्यापूर्वी एकनाथ शिंहे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर राज्यात पराकोटीला गेलेल्या सत्तासंघर्षामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. या सत्तासंघर्षात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भूमिकेवरूनही जोरदार टीका करण्यात आली. यानंतर एका जवळपास आठवड्याभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर भाष्य केले असून, अशी तत्परता दाखवणारे पहिलेच राज्यपाल पाहिले, असा टोला लगावला आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर काही दिवसांच्या अंतराने भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याबाबत पत्र दिले होते. यानंतर लगेचच राज्यपालांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. या घडामोडींवरून शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले

बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली. पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले. ४८ तासाच्या आत बहुमत चाचणीचा निर्णय राज्यपालांनी दिला, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत बोलताना, न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते

नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे बंड एका दिवसात झालेले नाही. खूप दिवसांपासून बंडाची तयारी केली गेली असेल. मात्र, या बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नाही. त्यामुळे भविष्यात बंडखोरांना जनतेसमोर येऊन खरे कारण सांगावे लागेल. मध्यावधी निवडणुका लागतील असे मी म्हणालो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असे सांगितले आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागले पाहिजे. सन २०२४ साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे. मविआ म्हणून एकत्र लढावे अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp chief sharad pawar taunts governor bhagat singh koshyari over floor test directions to maha vikas aghadi govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.