Clyde Crasto: "राज ठाकरेजी पण यापुढे 'भारत माता की जय' बोलणार का?"; राष्ट्रवादीचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 02:57 PM2022-08-25T14:57:15+5:302022-08-25T15:09:11+5:30
NCP Clyde Crasto And MNS Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना एक प्रश्न विचारला आहे. क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी "कवी इकबाल यांनी लिहिलेल्या काव्यामध्ये त्यांनी भारत म्हटलं नाही तर सारे जहां से अच्छा 'हिंदुस्तान' हमारा असं म्हटलं आहे. हे हिंदूचं स्थान आहे. कवी इकबाल हिंदुस्तान म्हणतात आणि आम्ही हिंदू या देशाला भारत म्हणतोय. आम्ही बोलतानाही आमच्या भारतात म्हणतो, नाहीतर काय अगदी सोपं असतं इंडिया..." असं म्हटलं होतं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावरून राज ठाकरेंना खोचक सवाल विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंना एक प्रश्न विचारला आहे. क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे."'भारत' माता की जय, सारे जहां से अच्छा 'हिंदुस्तान' हमारा, यह नारे हम दिल से और गर्व से लगाते रहेंगे । प्रश्न आहे की, राज ठाकरेजी पण या पुढे... 'भारत माता की जय', बोलणार का?" असं क्लाईड क्रास्टो यांनी म्हटलं आहे.
'भारत' माता की जय,
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) August 25, 2022
सारे जहां से अच्छा 'हिन्दुस्तान' हमारा,
यह नारे हम दिल से और गर्व से लगाते रहेंगे ।
प्रश्न आहे की, राज ठाकरेजी पण या पुढे...
'भारत माता की जय', बोलणार का ?
आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात मनसेही सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेनं पुण्यातील विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात बारामती लोकसभेसाठी वसंत मोरे यांना निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या जबाबदारीनंतर वसंत मोरे कामाला लागले आहेत. आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मनसे बारामतीतुन उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वसंत मोरेंनी कंबर कसली आहे.
नगरपरिषद-जिल्हा परिषदेसाठी मनसे बारामतीत उमेदवार देणार
बारामतीत नेमकं काम कसं करायचं? याचं नियोजन वसंत मोरे यांनी सुरु केलं आहे. तसेच बारामतीतील प्रचारादरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांना बोलवण्याचा मानस असल्याचंही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांच्या सहीने पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून किशोर शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अजय शिंदे, बाळा शेडगे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.