राष्ट्रवादीशी आघाडीस काँग्रेस अनुकूल - चव्हाण

By admin | Published: February 25, 2017 04:41 AM2017-02-25T04:41:11+5:302017-02-25T04:41:11+5:30

राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

NCP is Congress friendly - Chavan | राष्ट्रवादीशी आघाडीस काँग्रेस अनुकूल - चव्हाण

राष्ट्रवादीशी आघाडीस काँग्रेस अनुकूल - चव्हाण

Next

मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारी गांधी भवन येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला आहे. २५पैकी बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
बैठकीला खा. चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, आ. भाई जगताप, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: NCP is Congress friendly - Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.