Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 10:53 AM2022-07-31T10:53:32+5:302022-07-31T10:54:43+5:30

Maharashtra Political Crisis: नवे शिंदे-फडणवीस सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.

ncp eknath khadse claims that eknath shinde and devendra fadnavis govt likely to be collapse | Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित

Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित

googlenewsNext

जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठे भाकित केले आहे. नवे सरकार कोसळू शकते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार, याबाबत सत्ताधाऱ्यापासून ते विरोधकांपर्यंत मते व्यक्त होत आहेत. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर एकनाथ खडसे प्रतिक्रिया देताना, यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते, असा दावा केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

एकनाथ खडसेंचे शिंदे सरकारवर गंभीर आरोप

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. घटनेच्या १० व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार या पूर्वी अशाच प्रकरणांवर निर्णय झालेले आहेत. हे सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे. हे सरकार कोसळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकते. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात १६ आमदारांच्या पात्रतेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. त्या १६ आमदारांना एकतर गट स्थापन करून कोणत्यतरी पक्षात जावे लागेल, नाहीतर ते अपात्र ठरू शकतात, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, या प्रकरणी १ तारखेलाच निर्णय होईल, असे ठामपणे सांगता येत नाही. कदाचित सर्वोच्च न्यायालय पुढील तारखाही देऊ शकते. किंवा मग हे प्रकरण घटनापीठाकडेही सोपविले जाऊ शकते. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्यकारभार चालवत आहेत. जो पर्यंत न्यायालयाचा निकाल लागत लागत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत आहे असे दिसते, असे खडसे म्हणाले. 
 

Read in English

Web Title: ncp eknath khadse claims that eknath shinde and devendra fadnavis govt likely to be collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.