Maharashtra Politics: “शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले, आरोप करणे म्हणजे मुर्खपणाचे”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 08:47 AM2022-10-10T08:47:09+5:302022-10-10T08:48:26+5:30

Maharashtra News: शिंदे गटाने शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ncp eknath khadse replied shinde group vijay shivtare about criticism on sharad pawar | Maharashtra Politics: “शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले, आरोप करणे म्हणजे मुर्खपणाचे”

Maharashtra Politics: “शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले, आरोप करणे म्हणजे मुर्खपणाचे”

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शिंदे गटातील नेत्याने केलेल्या टीकेला आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिले असून, शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले. शरद पवारांवर आरोप करणे मुर्खपणाचे आहे, असा पलटवार एकनाथ खडसे यांनी केला. 

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवारांवर टीका करताना अनेक आरोप केले. शरद पवार यांनी सन २०१४ पासून नियोजनबद्ध पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, असे विजय शिवतारे यांनी म्हटले होते. याला एकनाथ खडसे यांनी उत्तर देताना शिंदे गटावर निशाणा साधला. 

शरद पवारांनी अनेक माणसे मोठे केली

शरद पवार हे बर्मुडा ट्रँगल आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसं मोठे केली आहेत ती पाहावीत. शरद पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे मूर्खपणा आहे.  शरद पवार यांनी एका रात्रीत महाविकास आघाडी निर्माण केली. या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणली. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार आले आणि ते अडीच वर्ष चालले. आता सुरु असलेले राजकारण राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, या शब्दांत एकनाथ खडसे यांनी विजय शिवतारेंवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, सरसेनापती बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच्या जोरावर महाराष्ट्रामधील अनेक सत्ता केंद्रांवर त्यांनी सत्ता मिळवली. राज्य सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले. ही वर्षानुवर्षाची पुण्याई आहे ती दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही, हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावरच समजेल. परंतु, तात्पुरते का होईना निवडणूक चिन्ह गोठवणे हे अत्यंत क्लेशदायक आहे अशी खंत एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp eknath khadse replied shinde group vijay shivtare about criticism on sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.