राष्ट्रवादीला शहाणपण, केलेली चूक सुधारली
By admin | Published: September 22, 2014 02:35 AM2014-09-22T02:35:13+5:302014-09-22T02:35:13+5:30
भाजपाशी सलगी करून गेली अडीच वर्षे काही जिल्हा परिषदांमध्ये सत्तेत वाटा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी अखेर आपली चूक सुधारत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली.
यदु जोशी, मुंबई
भाजपाशी सलगी करून गेली अडीच वर्षे काही जिल्हा परिषदांमध्ये सत्तेत वाटा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी अखेर आपली चूक सुधारत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जागा वाढवून हव्या असलेल्या राष्ट्रवादीने हे शहाणपण दाखविले. रविवारीही भाजपाला साथ दिली असती तर काँग्रेसच्या रोषाचा सामना करावा लागला असता आणि जागा वाटपाच्या बोलणीवर त्याचा विपरीत
परिणाम झाला असता म्हणून घड्याळाने पंजाची सोबत केल्याचे म्हटले जाते. भाजपाशी असलेली अभद्र युती तोडा, असे
काँग्रेसने राष्ट्रवादीला वारंवार सांगितले होते.
राष्ट्रवादीच्या बंडखोरीवर काँग्रेसने बारीक नजर ठेवली होती आणि यावेळी दगाफटका दिला तर त्याचा परिणाम आघाडीवर होऊ शकेल, असे सूचित केल्याने राष्ट्रवादीने भाजपापासून अंतर राखले, असे स्पष्ट दिसते. दुसरे म्हणजे राष्ट्रवादीने कमळाला हात दिला असता तर जातीयवादी पक्षांसोबत असल्याचा प्रचार विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर झाला असता. हे टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने भाजपाशी असलेली युती तोडली असे म्हटले जात आहे. उपराजधानी नागपुरात भाजपाची साथ राष्ट्रवादीने सोडली खरी पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडात भाजपाला सत्तेपासून रोखण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला अपयश आले.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती या पाचही जिल्हा परिषदांत राष्ट्रवादीने भाजपाशी फारकत घेतली. तरीही नागपूर, चंद्रपूरमध्ये पुन्हा भाजपाने कब्जा मिळविला. गडचिरोलीत राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळाले तर काँग्रेसला उपाध्यक्षपद. चंद्रपुरात राष्ट्रवादीने (पान ४ वर)