Amruta Fadnavis: “सरकारी बंगल्यात अमृता फडणवीस यांनी रील बनवलं, अधिकृत परवानगी घेतली होती का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:20 PM2023-01-19T12:20:09+5:302023-01-19T12:22:57+5:30

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांचे रियाझ अलीसोबतचे रील प्रचंड व्हायरल होत आहे.

ncp hema pimpale criticised amruta fadnavis over instagram reel with riyaz ali on punjabi song | Amruta Fadnavis: “सरकारी बंगल्यात अमृता फडणवीस यांनी रील बनवलं, अधिकृत परवानगी घेतली होती का?”

Amruta Fadnavis: “सरकारी बंगल्यात अमृता फडणवीस यांनी रील बनवलं, अधिकृत परवानगी घेतली होती का?”

googlenewsNext

Amruta Fadnavis: भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे अलीकडेच पंजाबी गाणे रिलीज झाले आहे. सध्या या गाण्याची चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांची या गाण्याला पसंती मिळत आहे. यानंतर आता याच पंजाबी गाण्यावर अमृता फडणवीस यांनी रील स्टार रियाज अलीसोबत रील व्हिडिओ बनवला असून, तो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांनी केलेले रील प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, यावरून आता राष्ट्रवादीकडून अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. 

अमृता फडणवीस यांच्या या रीलची चर्चा सुरू आहे. रियाझ अलीसह या व्हिडीओमध्ये त्या गाण्याची हूक स्टेप करत डान्स करताना दिसत आहेत. अमृता यांचा रियाझ अलीबरोबरचा रील प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी अमृता फडणवीसांना ट्रोल करत आहेत. यात आता या रीलसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका करत रीलवरच आक्षेप नोंदवला आहे. 

सरकारी बंगल्यात अमृता फडणवीस यांनी रील बनवलं

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रियाझ अलीबरोबरचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. तो रील व्हिडीओ सरकारी बंगल्यात शूट करण्यात आला आहे. अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात रील बनवण्यासाठी सरकारकडून लेखी अधिकृत परवानगी घेतली होती का? हेही रीलप्रमाणे व्हायरल करावे, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. तसेच अमृता फडणवीस यांना सरकारने अगोदरच बेकायदेशीरपणे वाय दर्जाची सुविधा दिलेली आहे. वास्तविक पाहता, वाय दर्जाची सुविधा ही केवळ संविधानिक पदाच्या व्यक्तीला दिली जाते. तरीही सत्तेचा गैरवापर करत अमृता फडणवीसांना अशा प्रकारची सुरक्षा देण्यात आली आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

दरम्यान, अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत याआधी 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचे गाणं प्रदर्शित झाले होते. तसेच व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘ये नयन डरे डरे’ हे गाणे गायले होते. अमृता फडणवीस यांच्या गाण्यांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, कौतुकाचा वर्षाव केला होता. काहींनी गाणे अतिशय सुंदर असल्याचे म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp hema pimpale criticised amruta fadnavis over instagram reel with riyaz ali on punjabi song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.