“एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 11:17 AM2023-06-14T11:17:13+5:302023-06-14T11:20:00+5:30

Jayant Patil News: महाविकास आघाडीपुढे यांचा टिकाव लागणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

ncp jayant patil criticised eknath shinde and devendra fadnavis | “एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका

“एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका

googlenewsNext

Jayant Patil News: महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. यातच राज्यात होणाऱ्या दंगलींवरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सलोखा बिघडवून दंगली होत आहेत. खरे तर या दंगली घडविल्या जात आहेत, अशी शंका आहे. राज्यात घडणाऱ्या दंगली एकाच पॅटर्ननुसार होत आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. तसेच ज्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे दंगली घडविल्या जात आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. 

एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व्हे केला आहे. शिंदे यांना लोकांचा चांगला पाठिंबा आहे, तर भाजपने याचा विचार करावा. पण, महाविकास आघाडीपुढे यांचा टिकाव लागणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला. तसेच कोल्हापूर, नाशिक, नगर येथील दंगली पाहिल्यानंतर त्याबद्दल शंका येऊ लागते. गृहमंत्र्यांनी एखादी बैठक बोलवावी. आम्ही विरोधी पक्ष म्हणून हवे ते सहकार्य करायला तयार आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकप्रियतेसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रियांचे घमासान युद्ध सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते अस्वस्थ तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मग काय झाले, असे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हे तर होणारच होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर अन्य राजकीय पक्षांकडून यांच्याकडून साधनशुचितेची अपेक्षा तरी कशी करणार, असा प्रश्न केला.


 

Web Title: ncp jayant patil criticised eknath shinde and devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.