Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”; जयंत पाटलांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 07:07 PM2022-09-22T19:07:45+5:302022-09-22T19:09:05+5:30

बारामती जिंकू शकत नाही, हे भाजपलाही माहिती आहे. ते तेथील विकास पाहायला जात असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

ncp jayant patil criticized eknath shinde group and bjp govt over various issue | Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”; जयंत पाटलांचा खोचक टोला

Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”; जयंत पाटलांचा खोचक टोला

googlenewsNext

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. तेव्हापासून सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

शिंदे सरकार अस्थिर आहे. नवीन सरकार स्थापन होऊन आता इतके दिवस झाले, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. बारामतीमध्ये येऊन भाजपला छुप्या पद्धतीने विकास बघायचा आहे. भाजपला माहिती आहे की बारामतीत आपण जिंकू शकत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला. तसेच भाजपच्या नेत्या बारामती दौऱ्यावर आलेल्या आहेत. जीएसटीबद्दल त्यांना प्रश्न विचारायची संधी दिली आहे, त्यांना जनता विचारेल आता, असे सांगत निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर जयंत पाटील यांनी टीका केली.

शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो

शिंदे गटातील आमदार खासगीत बोलताना सांगतात की, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो, असा टोला लगावताना, भाजपला आपल्या संख्याबळाची कायम भीती लागून राहिलेली आहे. आधी १२३ आमदार निवडून आले होते. मागच्या निवडणुकीत ती संख्या घटून १०५ वर आली आणि आता जे काही केले आहे, त्यामुळे जनता नाराज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तीच संख्या ८० ते ८५ पर्यंत खाली येते की काय, अशी भीती भाजपला सतावतेय, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

दरम्यान, शिंदे सरकारवर टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालय केव्हाही ४० आमदारांना अपात्र ठरवू शकते. शेड्युल १० प्रमाणे अपात्र ठरवावेच लागेल. याशिवाय निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावरही अजून निकाल यायचा बाकी आहे. त्यामुळे या दोन गोष्टींचे काम शिंदे गटाला राहिले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

 

Web Title: ncp jayant patil criticized eknath shinde group and bjp govt over various issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.