“लस महोत्सव नक्की करु, पण आधी पुरवठा करा आणि शक्य नसेल तर...”; जयंत पाटील आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 05:32 PM2021-04-09T17:32:12+5:302021-04-09T17:43:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अधिकाधिक लसीकरण (Corona Vaccination) करण्यासाठी ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

ncp jayant patil react over pm narendra modi corona vaccination drive | “लस महोत्सव नक्की करु, पण आधी पुरवठा करा आणि शक्य नसेल तर...”; जयंत पाटील आक्रमक

“लस महोत्सव नक्की करु, पण आधी पुरवठा करा आणि शक्य नसेल तर...”; जयंत पाटील आक्रमक

Next
ठळक मुद्देजयंत पाटील यांचे कोरोना लसीकरणावरून केंद्रावर टीकास्त्रपंतप्रधान मोदींकडून लस महोत्सवाचे आवाहनकेंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी - पाटील

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन ते तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. पात्र लाभार्थ्यांचे अधिकाधिक लसीकरण (Corona Vaccination) करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. (jayant patil react over pm narendra modi corona vaccination drive)

राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहेत. काही ठिकाणी कोरोना लस तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाला आहे. यावरून जयंत पाटील निशाणा साधत म्हणाले की, लस वाटप नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयश दिसत आहे.

कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

लस महोत्सव नक्की करु, पण...

पंतप्रधाननरेंद्र मोदींनी यांनी देशात चार दिवस लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. लस महोत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही महोत्वस करू. पण आधी तर लस द्या. लस पुरवठा करणे शक्य नसेल, तर लस महोत्सवाची वेळ बदला, असे जयंत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्राची कोरोना लसींची मागणी सुमारे ४० ते ५० लाख होती. मात्र, केंद्राकडून फक्त साडे सतरा लाख लसी आल्या. या लसी लगेच संपतील, असेही ते म्हणाले.

संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक; म्हणाले...

केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी

कोरोना लस वाटप हे केंद्राच्या हातात आहे. केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जे जे सांगितले ते ते देश करायला तयार आहे. त्यांनी थाळी वाजवायला सांगितली, आम्ही तेही केले. त्यावर टीका केली नाही. पण, आता देशात कोरोना लसीचा फक्त पुरवठा झाला पाहिजे. आम्ही लस महोत्सवही करू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp jayant patil react over pm narendra modi corona vaccination drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.