Jayant Patil: “...म्हणून भाजपवाले मनसेशी युती करायला घाबरत आहेत”; राष्ट्रवादीने सांगितले ‘राज’कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 10:39 PM2022-04-11T22:39:50+5:302022-04-11T22:40:54+5:30

Jayant Patil: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

ncp jayant patil reaction over bjp and mns yuti and other issues in the state | Jayant Patil: “...म्हणून भाजपवाले मनसेशी युती करायला घाबरत आहेत”; राष्ट्रवादीने सांगितले ‘राज’कारण

Jayant Patil: “...म्हणून भाजपवाले मनसेशी युती करायला घाबरत आहेत”; राष्ट्रवादीने सांगितले ‘राज’कारण

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिकच झडताना दिसत आहेत. यातच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर भाजप-मनसे युतीच्या पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजप मनसेच्या जवळ जायला घाबरत असल्याचा दावा करत यामागील कारणही सांगितले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला, राज ठाकरे यांचे पाडवा मेळाव्यातील भाषण, भाजप-मनसे युतीसंदर्भात भाष्य केले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला बराच अवकाश असला तरी, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारणाला वेग आला आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप अशी थेट लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचा वापर भाजपकडून सुरु आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. 

भाजपवाले धाडस करत नाहीयेत, कारण...

मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो, याचा अंदाज त्यांना आला आहे. त्यामुळेच भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे. मनसेची मते तशीही भाजपला मिळणार नाही. म्हणून मनसेच्या जवळ जायला भाजप घाबरत आहे. भाजपची मनसेला जवळ करण्याची पूर्वीपासूनची इच्छा फार आहे, पण अजून त्यांनी ते धाडस केलेले नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले. त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते. याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 
 

Web Title: ncp jayant patil reaction over bjp and mns yuti and other issues in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.