Maharashtra Politics: “अंदमानाचा इतिहास काढून टाका आणि मला सावरकर समजून सांगा”: जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:56 PM2023-02-06T18:56:27+5:302023-02-06T18:58:11+5:30
Maharashtra Politics: मी सरळ आणि थेट बोलतो. माझ्या मतावर ठाम असतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितले.
Maharashtra Politics: मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकासमोर मांडले. तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही उत्तर देऊ, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना सवाल करत, अंदमानाचा इतिहास काढून टाका आणि मला सावरकर समजून सांगा, असे म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड सरळ आणि थेट बोलतो. मी माझ्या मतावर ठाम असतो. माझे वक्तव्य २ हजार टक्के वादग्रस्त नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर लढण्यासाठी अफजल खान १ लाखाचे सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला होता. अफजल खान लाखाचे सैन्य घेऊन आला असला तरी त्याच्याबरोबर लढताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त पाच सैनिकांना घेऊन त्याच्यासमोर गेले होते. अफजल खानसमोरही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवत अफजल खान बरोबर ते लढले त्यामुळे शिवाजी महाराज मोठे खऱ्या अर्थाने मोठे ठरले, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अंदमानाचा इतिहास काढून टाका आणि मला सावरकर समजून सांगा
जी लोक आपल्या वक्तव्यावर आक्षेप घेतात त्यांनी अंदमानाचा इतिहास बाजूल काढून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास समजून सांगावा, असा आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अगदी महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दाखल दिले. त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यातून बाजूला काढले तर त्यांचे काय उरते, असा प्रतिसवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"