"विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं"; 'तो' फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:41 AM2020-06-24T11:41:53+5:302020-06-24T11:45:22+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पेट्रोल-डिझेल दररोज महाग होत आहे. गेल्या 18 दिवसांपासून सतत इंधनाचे दर 50 ते 60 पैशांनी वाढत असून आज देशात कधीही न घडलेली गोष्ट घडली आहे. दिल्लीत पहिल्यांदाच डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त झाली आहे. इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतींवरून जितेंद्र आव्हाड यांनी एक जुनं पोस्टर शेअर करत निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपने लावलेलं एक पोस्टर आव्हाड यांनी ट्विट करून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून "आज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले. पेट्रोल 17 पैसे ते 20 पैसे तर डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये" असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.
आज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 24, 2020
पेट्रोल १७ पैसे ते २० पैसे तर डिझेलच्या दरात ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर ७७.४९ रुपये
ही होर्डींग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती
विसरला असाल तर लक्षात आणुन द्यावे म्हंटल pic.twitter.com/n6573ZS0n3
पेट्रोल आणि डिझेलचा दर सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांनी 2014 च्या निवडणूक प्रचाराच्या काळात भाजपाने पेट्रोल पंपांवर लावलेल्या एका बॅनरचा फोटोही ट्विट केलं आहे. 'ही होर्डिंग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती... विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं' असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी 'देशातील जनता सध्या कोरोनाचा सामना करण्यात गुंतली आहे. तसेच भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाकडेही लोकांचं लक्ष आहे. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीकडे त्यांचं लक्ष जाणार नाही हे केंद्र सरकारला चांगलं माहीत आहे' असं म्हटलं होतं.
*Fuel prices have been hiked again!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 22, 2020
In the last 16 days, the petrol prices have been increased by Rs 8.30 per litre while diesel by Rs 9.22 a litre.
They know quite well people are bizi in #coronavirus and #ChinaIndiaFaceoff so will b ignorant about fuel price hike
देशभरात इतर ठिकाणी मात्र पेट्रोल डिझेलमध्ये कमालीचे अंतर आहे. महाराष्ट्रात हे अंतर 10 रुपयांचे आहे. दिल्लीने पेट्रोलवर कमी कर आकारत डिझेलवर जास्त कर लावला आहे. प्रदूषणामुळे डिझेलचा वापर कमी करावा हा त्यामागचा मूळ उद्देश असला तरीही महसूलही महत्वाचा असल्याने डिझेलवरील कर जास्त आहे. 2014 मध्ये इंधनाच्या किंमतींचे डिरेग्युलरायझेशन करण्यात आले आहे. यानुसार आता दिवसाला इंधनाच्या किंमती बदलल्या जातात. दिल्लीमध्ये पेट्रोलवर 64 टक्के आणि डिझेलवर 63 टक्के कर आकारला जातो. कर जवळपास समान असल्याने पेट्रोल आणि डिझेलमधील अंतर जवळपास समान झाले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारीhttps://t.co/mqs1AiLCCr#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 24, 2020
CoronaVirus News : ऑनलाईन शिक्षणासाठी घेतला पुढाकार, मजुरांच्या मुलांना, गरीब विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हातhttps://t.co/zIIofwBQw8#CoronavirusIndia#CoronaLockdown#school#OnlineClasses#education
— Lokmat (@MiLOKMAT) June 24, 2020
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! तब्बल 62 एन्काउंटर करणाऱ्या माजी DSP ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं...
CoronaVirus News : देशात कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने पुन्हा रेकॉर्ड मोडला
CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा
"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल