राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे बिगुल

By admin | Published: December 30, 2016 03:01 AM2016-12-30T03:01:43+5:302016-12-30T03:01:43+5:30

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आघाडीबाबत काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नाही.

NCP launches blunder | राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे बिगुल

राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे बिगुल

Next

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आघाडीबाबत काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे तूर्तास तरी काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नसताना, राष्ट्रवादीने थेट उमेदवारांची यादी जाहीर केल्याने, मुंबईतील राजकीय वातावरणात तापले आहे.
गुरुवारी दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत, उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उमेदवारी घोषित करण्यापूर्वी स्थानिक संसदीय मंडळात उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यात आली. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. यादीत डॉक्टर, वकील आणि उच्चशिक्षित उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे राष्ट्रवादीचे धोरण होते. मात्र, काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. उलट आघाडीची आवश्यकता नसल्याची विधाने मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी केली. त्यामुळे मुंबईत जिथे जिथे राष्ट्रवादीची ताकद तिथे सक्षम उमेदवार देण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. आतापर्यंत ३४० हून अधिक जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचे अहिर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सहा विद्यमान नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे, तसेच ज्या नगरसेवकांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला, तिथे विद्यमान नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीची मुंबईत ताकद नाही. त्यामुळे आम्हाला आघाडीची गरज नाही, असे वक्तव्य मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले होते. यावर, निरुपम यांनी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत हीच भाषा कायम ठेवावी, असे आव्हान सचिन अहिर यांनी दिले. स्वत: निवडणूक लढवायची वेळ आली की, या नेत्यांना राष्ट्रवादीची आठवण येते, असा टोलाही अहिर यांनी लगावला.

राष्ट्रवादीच्या पहिल्या ४५ उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे (कंसात वॉर्ड क्रमांक)
अमरनाथ काशिनाथ झा (३), कृष्णाजी भाऊराव राणे (११), अजय देसाई (१२), पूजा कुणाल मनवाचार्य (२२), किरण पुषोत्तम मोरे(२९), रुपाली अजित रावराणे (३७), रंजना सुभाष धनुका (४४), सारिका आॅस्टिन गे्रसेस (४९), सुनिता सुखदेव कारंडे (५७), रझिया उबेर सबरी(६१), मधुसूदन बी. सदडेकर (६८), बबन आर. मदने (८०), राजमणी गोमतीप्रसाद शुक्ला (८२), नेहा
सुहास पाटील (९२), प्रमोद आर. गायकवाड (९५), सुरैना नीलेश मल्होत्रा (९८), मीनाक्षी सुरेश पाटील(१०४), नंदकुमार वैती
(१०६), भारती धनंजय पिसाळ (१११), मनिषा तुपे (११६), सुशिला मामा मंचेकर (११७), मनिषा रहाटे(११९), चारुचंदन शर्मा(१२०), ज्योती हारुन खान(१२४), राखी हरिश्चंद्र जाधव(१३१), फरिदा शौकत(१३७), परवीन नसीम खान(१३८), राजेंद्र वामन वाघमारे(१३९), शेख नादीया मोहसीन(१४०), साजिद अब्दुल खान (१४१), सारिका संजय कांबळे(१४२), इलासबी पैगंबर मुजावर (१४३), रुपाली सचिन दाते (१४४), सिराजउद्दीन सलाउद्दीन खान (१४५), नीलेश प्रकाश भोसले (१४६), झिन्नत अजिज कुरेशी (१४७), रेखा मधुकर शिरसाट (१४८), विजय चंद्रकांत भोसले (१५४), तृप्ती अमोल मातेले (१५७), विठ्ठल विरकर(१६६), सईदा आरिफ खान(१६८), अब्दुल रशिद मलिक(१७०), जितेंद्र पांडुरंग म्हात्रे(१७८), रुनाल राजन लाड (१९३), दशरथ एस. नितनवरे (१९६).

Web Title: NCP launches blunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.