Maharashtra Politics: NCPतील अंतर्गत धुसफूस शमेना! मिटकरींची मोहोडांविरोधात सायबर सेलकडे धाव; वाद टोकाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 06:46 PM2022-09-11T18:46:17+5:302022-09-11T18:46:56+5:30

अलीकडेच मानहानीची नोटीस बजावल्यानंतर अमोल मिटकरींनी आता शिवा मोहोड यांच्याविरोधात सायबर सेलकडे तक्रार दिली आहे.

ncp leader amol mitkari complaint to cyber cell against ncp yuvak congress shiva mohod | Maharashtra Politics: NCPतील अंतर्गत धुसफूस शमेना! मिटकरींची मोहोडांविरोधात सायबर सेलकडे धाव; वाद टोकाला

Maharashtra Politics: NCPतील अंतर्गत धुसफूस शमेना! मिटकरींची मोहोडांविरोधात सायबर सेलकडे धाव; वाद टोकाला

Next

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडूनही टीकेचा समाचार घेतला जात आहे. या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस शमताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्याविरोधात आता सायबर सेलकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून, यासंदर्भात मोहोड यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

अमोल मिटकरी आणि अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वादाने आता टोक गाठले आहे. व्हायरल होत असलेल्या विविध व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी थेट सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिटकरींच्या तक्रारीनंतर शिवा मोहोड यांना सायबर सेलकडून हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवा मोहोड यांनी थेट अमोल मिटकरी कामासाठी कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. तसेच एका महिला पदाधिकाऱ्याचे काय प्रकरण आहे? असा सवाल अमोल मिटकरी यांना विचारण्यात आला होता. अमोल मिटकरींनी आरोप फेटाळत शिवा मोहोडांना सूचक इशारा दिला होता. 

समाजात प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी ५ कोटींचा मानहानीचा दावा

सायबर सेलकडे व्हिडिओंबाबत तक्रार दाखल करण्यापूर्वी अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्याविरोधात समाजात प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी ५ कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला. तशी नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याच नोटिसीवर ‘मैं झुकेगा नहीं’, असा पलटवार मोहोड यांनी केला आहे. अमोल मिटकरींच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने एक व्हिडिओ तयार केला होता. मिटकरींची प्रतिमा, प्रतिष्ठा आणि स्थान मलीन केले आहे. मानसिक छळ आणि यातना सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर मिटकरींवर आरोप करणारे शिवा मोहोड आणि अन्य दोघांना नोटीसद्वारे लेखी माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती. माफी न मागितल्यास कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.  

दरम्यान, आमदार साहेबांनी नोटीस पाठवली आहे. पाच कोटीची नोटीस आहे. पाच कोटी यांनी वर्षभरात कमावले. या नोटीसला उत्तर देईन. परंतु अशा नोटीस कितीही पाठवल्या तरी घाबरणार नाही. सत्य आहे ते जनतेसमोर मांडणे बंद करणार नाही. 'मैं झुकेगा नहीं', असा डायलॉग म्हणत शिवा मोहोड यांनी अमोल मिटकरींना पुन्हा इशारा दिला होता. यानंतर आता सायबर सेलकडे केलेल्या तक्रारीबाबत मोहोड काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: ncp leader amol mitkari complaint to cyber cell against ncp yuvak congress shiva mohod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.